DNA मराठी

मनोरंजन

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार, पोलिसांकडून शोध सुरू

Ajaz Khan : सोशल मीडियावर नेहमी काहींना काही कारणाने चर्चेत राहणारा बॉलीवूड अभिनेता एजाज खानच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. माहितीनुसार मुंबईत एजाज खानविरोधात एका माहिलने बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, एका 30 वर्षीय महिलेने एजाज खानविरुद्ध मुंबई पोलिसांकडे एफआयआर दाखल केला. मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर एजाज खान फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या चारकोप पोलिसांनी सांगितले की, अभिनेता एजाज खानविरुद्ध अभिनेत्रीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा मोबाईल फोन बंद होता. एजाज खान पोलिसांच्या संपर्कातून फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. असे सांगितले जात आहे की एजाज खानने अभिनेत्रीला प्रपोज केले होते आणि तिच्या घरी गेल्यानंतर त्याने हा बलात्कार केला. एवढेच नाही तर एजाज खानने महिलेला तिचा धर्म बदलून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. बलात्कारासोबतच एजाज खानवर समाजात अश्लीलता पसरवल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शो दरम्यान एजाजने स्पर्धकांना अश्लील कृत्ये करण्यास सांगितले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोकांनी एजाज खान आणि उल्लू अॅपवर कारवाईची मागणीही केली. उल्लू अॅपने ‘हाऊस अरेस्ट’ शोचे सर्व भाग काढून टाकले आहे.

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार, पोलिसांकडून शोध सुरू Read More »

दरवर्षी 21 एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

Ashish Shelar: चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन 21 एप्रिल 1993 रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला 112 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपताका या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्याचेही शेलार यांनी जाहीर केले. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते मुहूर्ताचा क्लॅप देऊन करण्यात आले. यावेळी चित्रपताका महोत्सवाच्या शीर्षकगीताचे लोकार्पण करण्यात आले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या भव्य दिव्य सोहळ्याला ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांताराम, ज्येष्ठ चित्रपटकर्मी जब्बार पटेल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी आपल्याला कलाकार म्हणून मोठे करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले. राज्याच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात सगळ्या मान्यवरांसमोर आपला सत्कार झाल्याबद्दल त्यांनी आभार मानले. प्रेक्षकांना आनंद मिळेपर्यंत काम करत राहणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासारख्या द्रष्ट्या मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली ज्या योजना सुरू होत आहेत, त्याचा मराठी कलाकारांना भविष्यात निश्चित फायदा होणार आहे, असा विश्वासही सराफ यांनी व्यक्त केला. रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे 99’ हा चित्रपट यावेळी महोत्सवाचा उद्घाटनाचा चित्रपट म्हणून दाखवण्यात आला. विशेष सांस्कृतिक कार्यक्रम जुई बेंडखळे यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गाण्यावर नृत्य सादर केले. प्रसिध्द अभिनेत्री श्रेय बुगडे हिच्या निवेदनात रंगलेल्या या कार्यक्रमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. प्रसिध्द संगीतकार अजय अतुल यांच्या गाण्यावर अभिनेत्री मीरा जोशी यांनी नृत्य सादर केले. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्यावर अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने नृत्य सादर केले. राज्य सरकारची नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन योजना राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणाऱ्या अभिनेता सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांनी दिली. पुढचे चार दिवस ही योजना मोफत असून त्यानंतर नाममात्र दरात ही योजना सुरू राहणार आहे. इच्छुक नवोदित कलाकारांनी अकादमी येथे येऊन ऑडिशन द्यायची. या ऑडिशनमधून निर्माते दिग्दर्शक यांना कलाकारांची निवड करता येणार आहे. चित्रपताका महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 22 एप्रिलला दुपारी 12 वाजता ‘काल आज आणि उद्याचे मराठी चित्रपट – गीत, संगीत, शब्द, सूर आणि तंत्र’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे सूत्रसंचलन संगीतकार कौशल इनामदार करणार आहेत. दुपारी 3 वाजता प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांची मुलाखत अभिनेते, गीतकार किशोर कदम घेणार आहेत. सायंकाळी 6 वाजता चित्रपटाचे तंत्र आणि त्यातील सध्याच्या संधी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात उज्ज्वल निरगुडकर, पंकज सोनावणे, सुप्रिया पाटणकर सहभागी होणार असून सूत्रसंचलन सौमित्र पोटे करणार आहेत.

दरवर्षी 21 एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव Read More »

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

Actor Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. ‘दादासाहेब फाळके’, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त असलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली Read More »

the king of the golden age of tv richard chamberlain

Richard Chamberlain” टीव्हीच्या सुवर्णकाळातला राजा: रिचर्ड चेंबरलेन”

आता वेबसीरिज आणि मर्यादित मालिका हिट होत असल्या तरी, १९७०-८०च्या दशकात लघु मालिका म्हणजे टीव्हीवरील महाकाव्य होतं. त्या काळात एक नाव घराघरात पोहोचलं—रिचर्ड चेंबरलेन (Richard Chamberlain). या देखण्या, करिष्माई अभिनेत्याने आपल्या मोहक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. लघु मालिका: मोठा पडदा टीव्हीवर त्या काळी ‘शोगुन’, ‘द थॉर्न बर्ड्स’, ‘रूट्स’, ‘द विंड्स ऑफ वॉर’ अशा मालिका भव्यदिव्य होत्या. त्या केवळ टीव्ही शो नव्हत्या, तर त्या एक सांस्कृतिक सोहळा असायच्या. आठवडाभर प्रेक्षक त्यांची वाट बघायचे. आणि त्या सगळ्या गाजलेल्या मालिकांमध्ये रिचर्ड चेंबरलेनचं नाव अग्रस्थानी असायचं. डॉ. किल्डारे ते शोगुन चेंबरलेन पहिल्यांदा लोकप्रिय झाला तो ‘डॉ. किल्डारे’ या वैद्यकीय मालिकेमुळे. पण खरी कमाल त्याने ‘शोगुन’ आणि ‘द थॉर्न बर्ड्स’मध्ये केली. ‘शोगुन’मध्ये त्याने एक इंग्रज खलाशी साकारला जो जपानच्या सामुराय संस्कृतीत अडकतो. तर ‘द थॉर्न बर्ड्स’मध्ये त्याने एका कॅथोलिक पाद्रीची भूमिका केली, जो त्याच्या विश्वास आणि प्रेमामधील द्वंद्वात अडकतो. या भूमिकांमधील त्याचा अभिनय एवढा प्रभावी होता की लोक त्याच्या प्रेमात पडले. १९८० चे दशक: टीव्ही स्टारडमचा कळस आजच्या ओटीटी युगात कुठल्याही शोमध्ये मोठमोठे स्टार्स असतात, पण त्या काळात टीव्हीवर झळकणं म्हणजे वेगळंच. चेंबरलेनसारखा स्टार असणं म्हणजे त्या मालिकेच्या यशावर शिक्कामोर्तब होतं. तो फक्त देखणा नव्हता, तर त्याच्याकडे एक अशी किमया होती जी प्रेक्षकांना स्क्रीनसमोर खिळवून ठेवत असे. एक करिष्माई अभिनेता चेंबरलेनला केवळ हँडसम म्हणून ओळखलं जात नव्हतं. त्याचं अभिनय कौशल्य देखील तितकंच जबरदस्त होतं. त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच खोली होती, जी त्याच्या पात्रांना अधिक जिवंत करायची. त्याच्या अभिनयात एक आभिजातता होती, जी त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवत होती. अखेरचा निरोप रिचर्ड चेंबरलेनच्या निधनाने एका काळाचा अस्त झाला. टीव्हीवरील भव्यदिव्य लघु मालिकांच्या जमान्यात तो खऱ्या अर्थाने मेगास्टार होता. त्याच्या आठवणी अजूनही त्याच्या चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. आज टीव्हीचं स्वरूप बदललं असलं तरी, त्या सुवर्णकाळाची आठवण करून देण्यासाठी रिचर्ड चेंबरलेनचं योगदान अजरामर राहील. richard chamberlain यांना DNA मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली रिचर्ड चेंबरलेन यांच्या काही महत्त्वाच्या चित्रपट आणि मालिकांची यादी खाली दिली आहे: 📺 टीव्ही मालिका आणि लघु मालिका: 🎬 चित्रपट: रिचर्ड चेंबरलेन यांनी प्रामुख्याने टीव्ही लघु मालिकांमध्ये मोठी कामगिरी केली, पण त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदानही लक्षणीय होते. 💫

Richard Chamberlain” टीव्हीच्या सुवर्णकाळातला राजा: रिचर्ड चेंबरलेन” Read More »

‘भाईजान’ च्या चाहत्यांना धक्का, “टायगर वर्सेस पठान” सह बिग बजेट सिनेमाला ब्रेक!

Salman Khan: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान आणि शाहरुख खानच्या टायगर वर्सेस पठान या चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांना होती मात्र आतापर्यंत या प्रोजेक्टवर कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती सलमान खानने एका पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे त्याचे अनेक चाहते नाराज झाले आहे. मुंबईतील एका फाइव स्टार हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमान खानने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिली. सलमानची बिग बजेट फिल्म ठप्पएका मोठ्या फिल्मसाठी अॅटली सलमान आणि रजनीकांत यांना एकत्र आणण्याच्या तयारीत होता. मात्र, बजेट खूपच वाढल्यामुळे निर्मात्यांनी हा प्रोजेक्ट तूर्तास थांबवला आहे. “एक काळ होता जेव्हा आम्ही हे प्रोजेक्ट करण्याच्या तयारीत होतो. आम्ही खूप प्रयत्न केले, पण काही गोष्टी जुळून आल्या नाहीत,” असे सलमान म्हणाला. “टायगर वर्सेस पठान” वर काम नाही!सलमान खानने आणखी एक मोठा खुलासा केला की टायगर वर्सेस पठान हा मेगा प्रोजेक्ट सध्या कोणत्याही स्थितीत बनत नाही आहे. “आता तरी यावर कोणाचेही लक्ष नाही,” असे स्पष्ट करत त्याने चाहत्यांच्या आशेला तात्पुरता ब्रेक दिला. तर दुसरीकडे “अंदाज अपना अपना 2” साठी आमिरसोबत काम करण्यास आपण एक्साइटेड आहोत असं सलमान म्हणाला. सलमान आणि आमिर खान अंदाज अपना अपना 2साठी एकत्र येणार का, या प्रश्नावर तो म्हणाला, “हो, आम्ही दोघेही खूप उत्साहित आहोत. राजकुमार संतोषी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते काहीतरी भन्नाटच करणार.” “बजरंगी भाईजान 2” शक्य, पण कधी?बजरंगी भाईजानच्या सिक्वेलबद्दल विचारले असता सलमान म्हणाला, “हो, हे होऊ शकते. कबीर खान यावर काम करत आहे.” मात्र, त्याने कोणतीही ठोस माहिती दिली नाही.

‘भाईजान’ च्या चाहत्यांना धक्का, “टायगर वर्सेस पठान” सह बिग बजेट सिनेमाला ब्रेक! Read More »

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला धक्का: मनोज भारतीराजा निधन.

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज भारतीराजा यांचे चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज भारतीराजा हे प्रख्यात तमिळ दिग्दर्शक भारतीराजा यांचे पुत्र होते. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी हळहळली आहे. अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रातील योगदानमनोज भारतीराजा यांनी 1999 मध्ये त्यांच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ताजमहल’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘समुधिरम’, ‘अल्लु अर्जुन’, ‘वरुशामेलम वसंतम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये लक्षणीय भूमिका साकारल्या. त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही पदार्पण केले होते. 2013 मध्ये त्यांनी ‘मार्गजी थिंगल’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन केले. माहितीनुसार मनोज भारतीराजा यांना काही दिवसांपूर्वीच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मनोज भारतीराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “त्यांनी ‘ताजमहल’, ‘समुधिरम’, ‘अल्लु अर्जुन’, ‘वरुशामेलम वसंतम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. त्यांनी दिग्दर्शनही केले. मी दिग्दर्शक भारतीराजा, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो.” मनोज भारतीराजा यांच्या पश्चात त्यांची पत्नी नंदना आणि दोन मुली अर्शिता आणि मथिवाधानी असा परिवार आहे. अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सोशल मीडियावर लिहिले, “मनोज आता आपल्यात नाही हे ऐकून खूप मोठा धक्का बसला. त्यांचे अकाली निधन दुःखद आहे. ते फक्त 48 वर्षांचे होते. देव त्यांचे वडील थिरु भारतीराजा आणि त्यांच्या कुटुंबाला या असह्य वेदनादायक नुकसानातून सावरण्याची शक्ती देवो.”

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला धक्का: मनोज भारतीराजा निधन. Read More »

मोठी बातमी! राम सुतारांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर

Ram Sutar: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला. राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचं प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमूना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहचवले. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, देशाच्या संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दादरला चैत्यभूमी येथे उभारण्यात येत असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे त्यांच्या कलाकौशल्याप्रमाणेच या महामानवांवरील त्यांच्या प्रेमाचे, आदराचे प्रतिक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांचा गौरव केला. महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील या दीपस्तंभाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

मोठी बातमी! राम सुतारांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर Read More »

Maharashtra News: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा

Maharashtra News: मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या 27 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी 5 वाजता गौरव व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, कौशल, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, विरोधी नेते अंबादास दानवे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसद सदय तसेच दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित असणार आहे. मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झाला आहे. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहिर झाला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे. याशिवाय ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार जाहीर झाले आहे. यात वाङमय पुरस्कार प्रकार – प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अनिष्ठकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. प्रौढ वाडमय नाटक / एकांकिका याकरिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, प्रौढ वाङमय कादंबरी याकरिता हरि नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, प्रौढ वाडमय लघुकथा याकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निबांळकर यांना, प्रौढ वाङमय ललितगद्य याकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, प्रौढ वाङमय-विनोद याकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना जाहीर झाला आहे. प्रौढ वाङमय चरित्र याकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, प्रौढ वाङमय आत्मचरित्र याकरिता लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा.राठोड यांना, प्रौढ वाङमय समीक्षा/संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला/आस्वादपर लेखन याकरिता श्री.के.क्षीरसागर पुरस्कार हा समिर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. प्रौढ वाडमय राज्यशास्त्र / समाजशास्त्र याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नाही. त्याचप्रमाणे, प्रौढ वाङमय इतिहास याकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र/व्याकरण याकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञान याकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, उपेक्षितांचे साहित्य याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना तर अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन याकरिता सी.डी.देशमुख पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली नाही. तसेच तत्वज्ञान व मानसशास्त्र याकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांना, शिक्षणशास्त्र करिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना जाहीर झाला आहे. वाङमय पुरस्कार प्रकार – बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तर, नाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना, सर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांची रक्कम रूपये ५० हजार आहे. वाङमय पुरस्कार प्रकार – प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. तर प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारातील रा.भा.पाटणकर पुरस्कारांकरिता शिफारस नाही. या पुरस्काराची रक्कम रूपये ५० हजार अशी आहे. वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्कम रूपये १ लाख अशी आहे.

Maharashtra News: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा Read More »

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी

Sonu Sood Arrest Warrant: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदविरुद्ध फसवणुकीच्या कथित प्रकरणात लुधियाना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. माहितीनुसार, न्यायिक दंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी हे वॉरंट जारी केले. हा खटला लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या 10 लाख रुपयांच्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे, ज्यामध्ये त्यांनी बनावट रिझिका कॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवल्याचा दावा केला होता. सोनू सूदला साक्ष देण्यासाठी न्यायालयात बोलावण्यात आले होते परंतु तो हजर राहिला नाही, त्यामुळे अटक वॉरंट जारी करण्यात आले. सोनू सूदला न्यायालयासमोर हजर करालुधियाना न्यायालयाने आपल्या आदेशात, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला सोनू सूदला अटक करण्याचे निर्देश दिले. आदेशात म्हटले आहे की सोनू सूद, (मुलगा, पत्नी, मुलगी) रहिवासी, घर क्रमांक ६०५/६०६ कासाब्लँक अपार्टमेंट्स, यांना समन्स किंवा वॉरंट रीतसर बजावण्यात आले आहे परंतु ते हजर राहिले नाहीत (समन्स किंवा वॉरंटची सेवा टाळण्यासाठी फरार झाले आणि पळून गेले). तुम्हाला सोनू सूदला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. आदेशात पुढे असे म्हटले आहे की तुम्हाला हे वॉरंट १०-०२-२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामध्ये ते कोणत्या तारखेला आणि कोणत्या पद्धतीने अंमलात आणले गेले आहे किंवा ते का अंमलात आणले गेले नाही याचे कारण प्रमाणित करणारे पृष्ठांकन असेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी Read More »

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहे. तर आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी संबंधित काही नवीन आणि धक्कादायक माहिती शेअर केली आहे. पत्रकार परिषदेत पश्चिम विभागाचे अतिरिक्त सीपी परमजीत सिंह दहिया यांनी सैफ प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, सैफवरील हल्ल्याची तक्रार अभिनेत्याच्या घरून आली नव्हती तर रुग्णालयातून आली होती. पोलिसांना लीलावती रुग्णालयातून कळले की सैफवर हल्ला झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सैफ सुमारे 3 वाजता ऑटोने रुग्णालयात पोहोचला. त्याच वेळी, एसीपी दहिया यांनी असा दावाही केला की सैफ प्रकरणात अटक करण्यात आलेली व्यक्ती ही खरी आरोपी आहे आणि यात कोणताही गोंधळ नाही. त्यांनी सांगितले की पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत, जे ते न्यायालयात सादर करतील. सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशहून भारतात आलाएसीपी दहिया यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, आरोपी पश्चिम बंगालमार्गे भारतात दाखल झाला होता. तो काही दिवस कोलकात्यातही राहिला. पोलिसांनी असेही सांगितले की, ज्या महिलेच्या आधार कार्डवरून आरोपीने सिम घेतले होते, तिचा जबाब कोलकातामध्ये नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या फिंगरप्रिंटबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही. हे नमुने पुणे सीआयडीकडे पाठवण्यात आले आहेत. सैफ अली खान प्रकरणात अजूनही अनेक प्रश्नसैफ अली खान हल्ला प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे पोलिसांनी दिलेली नाहीत. घटनेच्या रात्री प्रत्यक्षात काय घडले हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. त्याचवेळी, आरोपी 11 व्या मजल्यावर राहणाऱ्या सैफच्या घरी चोरी करायला का गेला, तो खालच्या मजल्यावर चोरी करू शकला असता, याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही. हल्ला रात्री 2 वाजता झाला आणि पोलिसांना रात्री 3 वाजता कळवण्यात आले. एवढेच नाही तर आरोपी सकाळपर्यंत सैफच्या अपार्टमेंटच्या बागेत लपून का बसला होता?

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा Read More »