DNA मराठी

क्राईम

Ahmednagar News : धक्कादायक, हौदमध्ये पडून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ahmednagar News: मुकुंदनगर भागातील इस्लामी बेकरी परिसरात एका चार वर्षीय मुलाचा हौदमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून. या व्हिडिओमध्ये चालत असताना चिमुकला अचानक हौदमध्ये पडल्याचा दिसून येत आहे. सध्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

Ahmednagar News : धक्कादायक, हौदमध्ये पडून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू Read More »

Hezbollah Attack On Israel : हिजबुल्लाहकडून इस्रायलवर मोठा हल्ला केला, 70 रॉकेट डागले

Hezbollah Attack On Israel:  हिजबुल्लाने आपल्या कमांडरच्या मृत्यूनंतर बदला म्हणून इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. हिजबुल्लाने इस्रायलवर एकामागून एक 70 रॉकेट डागले आहेत. हा हल्ला इस्रायलच्या पश्चिम गॅलीलीमध्ये झाला. या हल्ल्याबाबत हिजबुल्लाहने अधिकृत वक्तव्यही केले आहे. हिजबुल्लाहने सांगितले की, “चामाला लक्ष्य करून अनेक नागरिकांच्या हौतात्म्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायली लष्करी लक्ष्यांवर रॉकेट हल्ले केले आहेत.” इस्रायलने 15 रॉकेट रोखले दरम्यान, लेबनीज लष्करी सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, लेबनीज सैन्याने दोन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये इस्रायलवर डागलेल्या सुमारे 70 रॉकेटचे निरीक्षण केले आणि त्यातील काही इस्रायली आयर्न डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने रोखले. इस्रायलच्या सरकारी टीव्ही चॅनल कानने वृत्त दिले की, रॉकेट पश्चिम गॅलीलीच्या दिशेने डागण्यात आले, त्यापैकी 15 रोखण्यात आले आणि उर्वरित रिकाम्या भागात पडले. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. हिजबुल्लाहचा टॉप कमांडर इस्रायलने मारला मंगळवारी बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगर दहीह येथे इस्रायली हल्ल्यानंतर हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे, ज्यात हिजबुल्लाह लष्करी कमांडर फौद शोकोर ठार झाला आहे. इस्त्रायली हल्ल्याला योग्य वेळी आणि ठिकाणी प्रत्युत्तर देण्याची धमकी हिजबुल्लाचे नेते हसन नसरल्लाह यांनी दिली. दुसरीकडे, इस्रायली सैन्याने गाझा शहरातील एका अपार्टमेंट ब्लॉकवर बॉम्बफेक केली आहे, ज्यामध्ये किती लोक मारले गेले हे समोर आलेले नाही. पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीच्या सूत्रांनी सांगितले की अपार्टमेंटच्या ढिगाऱ्यातून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले, जे अबू हाशेम कुटुंबाचे होते आणि गाझा शहरातील अल-जाला स्ट्रीटवर होते.

Hezbollah Attack On Israel : हिजबुल्लाहकडून इस्रायलवर मोठा हल्ला केला, 70 रॉकेट डागले Read More »

Sagar Triple Murder: धक्कादायक, आई आणि दोन मुलींची निर्घृण हत्या,घरात सापडले मृतदेह

Sagar Triple Murder: मध्य प्रदेशातील सागर येथे 30 जुलैच्या रात्री एका महिलेची आणि तिच्या दोन मुलींची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  माहितीनुसार, तिन्ही मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.  महिलेचा पती रात्री घरी पोहोचला असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस मृताच्या पतीची चौकशी करत आहेत. मृताच्या भावाने कुटुंबीयांवर खुनाचा संशय व्यक्त केला असून, घरातील सदस्यांमध्ये वाद होत असल्याचे सांगितले. मात्र, पोलीस सर्व मुद्यांचा बारकाईने तपास करत आहेत. 200 मीटर अंतरावर पोलीस नियंत्रण कक्ष सागरच्या पोलीस नियंत्रण कक्षासमोर 200 मीटर अंतरावर ही घटना घडली. मृत महिलेचा पती विशेष पटेल जिल्हा रुग्णालयात संगणक परिचालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री तो घरी पोहोचला तेव्हा त्याला घराचे दरवाजे उघडे दिसले. विशेष यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना पत्नी वंदना (32 वर्षे), मोठी मुलगी अवंती (8 वर्षे) आणि लहान मुलगी अन्विका (3 वर्षे) यांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले.  किचनमध्ये पत्नी आणि मोठ्या मुलीचे मृतदेह आढळून आले तर लहान मुलीचा मृतदेह खाली बेडरूममध्ये पडलेला होता. त्यानंतर रात्री उशिरा सासरच्या मंडळींना फोन करून या घटनेची माहिती दिली. स्वयंपाकघरात रक्त  घटनास्थळ पाहता त्यांचे डोके भिंतीवर आदळले असून डोक्यावर व शरीराच्या इतर भागावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत आहे. तिघांच्याही डोक्यातून रक्तस्त्राव होत असून रूम व स्वयंपाकघरात सर्वत्र रक्त पसरले होते. घटनेची माहिती मिळताच आयजी प्रमोद वर्मा, डीआयजी सुनील कुमार, एसपी प्रभारी डॉ संजीव उईके रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. पोलीस जवळपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासत आहेत. आज तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

Sagar Triple Murder: धक्कादायक, आई आणि दोन मुलींची निर्घृण हत्या,घरात सापडले मृतदेह Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी! संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक

Ahmednagar News: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अहमदनगर- संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे सायंकाळी एक विचित्र अपघात घडला आहे.  माहितीनुसार, अहमदनगरकडून संभाजी नगरकडे जाणाऱ्या कंटेनरने आठ वाहनांना मागिल बाजुने जोरदार धडक दिली. काही अंतरावर जाऊन कंटेनर चालक आपले ताब्यातील वाहन सोडून पळ काढला.  अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात पाठवुन वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहे.

Ahmednagar News: मोठी बातमी! संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक Read More »

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर …

Ahmednagar News: अहमदनगर येथील विशेष जिल्हा न्यायाधिश क्र. २ पी. आर. सित्रे यांनी अर्बन बैंक अपहार प्रकरणातील शंकर घनश्यामदास अंदानी यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सदरचा आदेश दि. २६/०७/२०२४ रोजी देण्यात आलेला आहे.    बँकेचे तांत्रिक संचालक शंकर अंदानी यांना अर्बन बैंक अपहार प्रकरणामध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती व तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते. त्यांचे वतीने ॲड. सतिश एस. गुगळे यांनी अंदानी हे व्यवसायाने सनदी लेखापाल असून सध्या ऑडीटचे सर्व कामकाज ठप्प पडले असल्याने व आरोपी हे व्यवसायाने लेखापाल असल्याने त्यांचे व्यवसायाचे व पर्यायाने कुटूंबाचे आर्थिक नुकसान होत आहे असा युक्तीवाद करुन शंकर अंदानी यांना तात्पुरता जामीन देण्याची मागणी ॲड. सतिश गुगळे यांनी न्यायालयास केली, त्यावर सरकार पक्षाने तीव्र विरोध दर्शविला, परंतू न्यायालयाने प्रकरणामध्ये असलेला त्यांचा सहभाग तसेच त्यांच व्यवसायीक अडचण व होणारे आर्थिक नुकसान या सर्व बाबींचा विचार करुन दि. २६/८/२०२४ पावेतो त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. सदर प्रकरणात मुळ जामीन अर्ज हा न्यायालयापुढे अद्यापही प्रलंबीत असून त्यावर नजीकचे भविष्य काळात सुनावणी होणे अपेक्षीत आहे.  या प्रकरणात  शंकर अंदानी यांचे वतीने ॲड. सतिश गुगळे यांनी पाहिले, त्यांना ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अक्षय गवारे, ॲड. अजित चोरमले, ॲड. हर्षद तांगडे, ॲड. अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले.

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर … Read More »

Mumbai Fire: मोठी बातमी! बोरिवली परिसरात 22 मजली इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू

Mumbai Fire: एकीकडे मुंबईमध्ये धो धो पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे बोरिवली परिसरात गुरुवारी एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई उपनगरातील बोरिवली भागातील एका उंच इमारतीला गुरुवारी 12.30 च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. 22 मजली कनाकिया समर्पण टॉवरमध्ये ही आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील कनकिया समर्पण टॉवरला 12.37 वाजता आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक बीएमसी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वात केलेल्या कारवाईत 1:02 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी 108 रुग्णवाहिका घटनास्थळी स्टँडबाय ठेवण्यात आली होती. इमारतीच्या पहिल्या आणि 16व्या मजल्यांदरम्यान असलेल्या इलेक्ट्रिक डक्टमधील विद्युत तारा आणि केबलला ही आग लागली. मात्र आग आणि धुरामुळे गुदमरल्याने चौघांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी महेंद्र शहा (70) यांना मृत घोषित केले. तर रंजना राजपूत (59), शिवानी राजपूत (26) आणि शोभा सावळे (70) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी, बुधवारी सकाळी मुंबईतील जोगेश्वरी भागात एका बहुमजली इमारतीला आग लागल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. धुरामुळे एका ज्येष्ठ नागरिकासह चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Mumbai Fire: मोठी बातमी! बोरिवली परिसरात 22 मजली इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू Read More »

Noida Crime News : ‘तो’ वारंवार बायकोला मेसेज करायचा, नवऱ्याला कळलं अन्….

Noida Crime News:  गुरुवारी ग्रेटर नोएडाच्या बदलपूर भागात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खडबड उडाली.  घराच्या शेजारी राहणारा पत्नीला वारंवार मेसेज करत असल्याने नवऱ्याने त्या व्यक्तीवर अनेक वेळा चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. माहितीनुसार, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.  पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शाब्दिक वादानंतर आरोपी संजयने सोनूवर धारदार वस्तूने वार केला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू त्याच्या कारमध्ये असताना वाद सुरू झाला आणि हाणामारी झाली. दुपारच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बदलापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संजयला ताब्यात घेण्यात आले तर सोनूला रुग्णालयात नेण्यात आले. चौकशीत संजयने सोनूवर हल्ला केल्याची कबुली दिली. सोनू अनेक दिवसांपासून सतत मेसेज पाठवून पत्नीला त्रास देत असल्याचा आरोप त्याने केला. या अधिकाऱ्याने सांगितले की, छळाचा कोणताही पुरावा अद्याप सापडला नसला तरी पोलीस सर्व पैलूंचा तपास करत आहेत.

Noida Crime News : ‘तो’ वारंवार बायकोला मेसेज करायचा, नवऱ्याला कळलं अन्…. Read More »

Nagpur News: गाडीत गर्लफ्रेंडशी रोमान्स करणे महागात पडले! जोडप्याला अटक, कारही जप्त

Nagpur News: नागपूर शहरात पोलिसांनी कारवाई करत चालत्या गाडीत रोमान्स करणाऱ्या एका जोडप्याला अटक केली आहे.   नागपूर पोलिसांनी 28 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि त्याचा गर्लफ्रेंडविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. तसेच या कारवाईत कारही जप्त करण्यात आली आहे. मुलगी इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही गाडी चालवताना अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. एका कथित व्हिडिओमध्ये, सूरज धरमपेठ परिसरात सोनी कार चालवताना दिसत आहे, तर मुलगी ड्रायव्हिंग सीटवर सूरजच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. यादरम्यान दोघेही अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलवर व्हिडिओ बनवला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. कारच्या क्रमांकाच्या मदतीने पोलिसांनी कारच्या मालकाचा शोध घेतला आणि त्यानंतर या जोडप्याला पकडले. मात्र, नंतर दोघांनाही जामीन मिळाला. आरोपी सूरज राजकुमार सोनी आणि त्याच्या मैत्रिणीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BRS) च्या कलम 296 (अश्लीलता), 281 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 293 (सार्वजनिक ठिकाणी उपद्रव) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यासोबतच एफआयआरमध्ये मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याची कलमेही जोडण्यात आली आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Nagpur News: गाडीत गर्लफ्रेंडशी रोमान्स करणे महागात पडले! जोडप्याला अटक, कारही जप्त Read More »

Accident News: भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, 2 गंभीर जखमी

Accident News:  देशात दररोज अपघताच्या घटना घडत आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, मध्य प्रदेशामधील शाहडोल जिल्ह्यातील बुधर पोलीस स्टेशन हद्दीतील लालपूर येथे कोळसा भरलेल्या ट्रेलरने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला धडक दिली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जणांना गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. बुधर पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय जयस्वाल यांनी सांगितले की, अनुपपूर येथून कोळसा भरून ट्रेलर शहडोलकडे जात होता. दरम्यान, लालपूरजवळील क्रशरजवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने ऑटोला जोरदार धडक दिली. या घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. 4 जणांची प्रकृती गंभीर असताना पोलिसांनी त्यांना त्यांच्याच वाहनातून वैद्यकीय महाविद्यालयात नेले, तेथे 4 पैकी 2 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर 2 जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. बिट्टू, रिया, रोशनी आणि ममता अशी या भीषण रस्ता अपघातात जीव गमावलेल्यांची नावे आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की ऑटो शहडोलहून धनपुरीच्या दिशेने जात होता, ज्यामध्ये 35 वर्षीय नेमचंद वडील हरिशंकर, 40 वर्षीय रोशनी पती मज्जू साकेत, 30 वर्षीय कुंज बिहारी त्रिपाठी, सर्व धनपुरी येथील रहिवासी आणि इतर वाहनात होते. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कागदपत्रांशिवाय कोळसा वाहतूक सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक कोळसा भरला होता, जो अनुपपूर येथील रामनगर येथून भरून रेवा येथे जात होता. मात्र, ट्रकची झडती घेतली असता कोळशाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. अपघातानंतर बुरहार येथील कोळसा व्यापारी घटनास्थळी पोहोचले होते. अपघातानंतर कोळसा व्यापारी वाहतुकीशी संबंधित कागदपत्रे तयार करण्यासाठी तातडीने खाणीवर पोहोचले होते, असेही सांगण्यात येत आहे.

Accident News: भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, 2 गंभीर जखमी Read More »

Ahmednagar News : नंदाच्या जमिनीत पेरलेल्या कपाशी व तूर पिकाची भावजाईने केली नासाडी, गुन्हा दाखल

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी असलेल्या महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांची बालमटाकळी येथे असणाऱ्या गट नंबर १३५ मधील दीड एकर शेतीमध्ये कपाशी व तूर पिकाची लागवड केली होती. हे पीक मोठी झाल्याने सोफिया फिरोज शेख व त्यांचे पती फिरोज शेख हे दोघे शनिवार दिनांक २९ जुलै रोजी दुपारी आपल्या शेतात खुरपण करत होते. तेव्हा  अचानक सोफिया शेख यांची भावजाई हुमेरा युनुस शेख राहणार अहमदनगर यांनी सोफिया फिरोज शेख व त्यांचे पती फिरोज शेख यांना   शेतामध्ये येऊन शिवीगाळ करत दीड एकर शेतीमधील उभे असलेले कपाशी व तुरीचे पीक हे आमच्या डोळ्यादेखत उपटून फेकून दिले. त्यामुळे फिर्यादीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  याबाबत हुमेरा युनूस शेख यांना आम्ही आमची कपाशी व तुर पीक का उपटले अशी विचारणा केली असता त्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.  याबाबत महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुमेरा युनुस शेख यांचे विरोधात शेवगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच आम्हाला न्याय न मिळाल्यास व आमच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिला आहे.

Ahmednagar News : नंदाच्या जमिनीत पेरलेल्या कपाशी व तूर पिकाची भावजाईने केली नासाडी, गुन्हा दाखल Read More »