DNA मराठी

क्राईम

IMG 20250204 WA0000

Maharashtra News: टायरची विक्री अन् फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक, 97 टायर जप्त

Maharashtra News: नगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ड्रायव्हरकडून परस्पर टायरची विक्री करून फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक केली आहे. आरोपीकडून 19,94,650 ( 97 टायर) जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर 2024 रोजीकंटेनर क्रमांक पीबी-13-एडब्लू-5064 यावरील चालकाने सीएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली असल्याचा  सुपा पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम 316 (4) प्रमाणे विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास करण्यासाठी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी  पोसई/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, गणेश लोढे, पंकज व्यवहारे, फुरकान शेख, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे दोन पथक तयार करुन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन तपास करणेबाबत आदेश दिले होते.   पथकाने यापुर्वी गुन्हयाचे तपासात दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी आरोपी 1) इरशाद निशार अहमद, (वय 55, रा.रामपूर कुमियान, पो.तलालपट्टी, प्रतापगड, उत्तरप्रदेश), 2) अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा, (वय 24, रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड, धुळे) यांना 2,52,000 रूपये किंमतीचे सीएट कंपनीचे 12 टायर अशा मुद्देमालासह सुपा पोलीस स्टेशनला हजर केले होते. दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी पथक गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना आरोपी नामे अन्सार, (रा.प्रतापगड, उत्तरप्रदेश) हा मुंबई येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने पथकाने मुंबई येथे जाऊन संशयीत आरोपीचा शोध घेऊन, दोन संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अन्सार अहमद (नयाबअली, वय 23, रा.सरायबीर भद्र, ता.सदर, जि.प्रतापगड, उत्तरप्रदेश), 2) जैद खान अजिम खान मोहमंद, (वय 27, रा.आझादनगर, घाटकोपर वेस्ट, मुंबई) असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाच्या विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा 3) जावेद खान, रा.प्रतापगड, उत्तरप्रदेश (फरार) 4) शरिफ खान, रा.राणीगंज, उत्तरप्रदेश (फरार) 5) जोशेफ अली, रा.पिरथीगंज, उत्तरप्रदेश (फरार) अशांनी मिळून इरशाद निशार अहमद याचे मदतीने मिळून केला असल्याची माहिती सांगीतली. तसेच गुन्हयांतील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता गुन्हयातील टायर हे सुरत येथील शिवलाल शहा, रा.पाल, सुरत, गुजरात याचे मार्फतीने योगेश गुंजाळ, रा.बेल्हे, आळाफाटा, पुणे यास विक्री केले असल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शिवलाल शहा, रा.सुरत याचा राहते घरी जाऊन शोध घेतला तो मिळून आल्याने त्यास पुर्ण नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 6) शिवलाल हसमुखलाल शहा, वय 58, रा.ए 602, मरोधर रेसीडेन्सी,  पाल, सुरत, गुजरात असे असल्याचे सांगीतले.गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली. दिनांक 31/01/2025 रोजी पथक गुन्हयातील मुद्देमाल हा योगेश गुंजाळ, रा.बेल्हे, पुणे याचेकडे असल्याने त्याचा गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना योगेश गुंजाळ हा त्याचे साथीदारासह बेल्हे गावात तांबेवाडी परिसरात टायर विक्री करण्याकरीता आला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने नमूद ठिकाणी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले.त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 7) योगेश अरूण गुंजाळ, वय 36, रा.दत्तनगर, बेल्हे, ता.जुन्नर, जि.पुणे 8) वैभव भगवंता चौधरी, वय 31, रा.चौधरी मळा, जामगाव, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. तपास पथकाने पंचासमक्ष आरोपीचे ताब्यातुन 15,12,000/-रू किं.त्यात 72 सीएट कंपनीचे टायर, 80,000/- रू किं.त्यात 3 मोबाईल असा एकुण 15,92,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी नामे योगेश अरूण गुंजाळ याचे उर्वरीत टायर बाबत विचारपूस करता त्याने सागर उर्फ महाराज शरद रूकारी यांना 10, दत्तात्रय शिवाजी सोमवंशी यांना 4, संकेत अशोक जाधव यांना 5 व राहुल संदीप औटी यांना 6 अशांना कंपनीकडून  टायर खरेदी केलेले असून टायरचे बील नंतर देतो असे खोटे सांगुन विक्री केल्याची पंचासमक्ष माहिती दिली.पथकाने पंचासमक्ष त्यांनी हजर केलेले 25 टायर किंमत रूपये 4,02,650/- असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील कारवाई सुपा पोलीस करत आहे.

Maharashtra News: टायरची विक्री अन् फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक, 97 टायर जप्त Read More »

Crime 1

Crime News: आईचा प्रेमसंबंध, नाराज मुलांनी केला चाकूने – रॉडने वार अन् घडलं असं काही…

Crime News: आईच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज झालेल्या दोन मुलांनी चाकूने सपासप वार करून एका व्यक्तीची हत्या केली आहे. हे धक्कादायक प्रकरण गुजरातमधील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील गांधीनगरमध्ये दोन भावांनी एका व्यक्तीची चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. त्याच्या आईसोबतच्या प्रेमसंबंधाच्या रागातून हे कृत्य केल्याचे वृत्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपीने पीडितेची आतडेही बाहेर काढली आणि बाहेर फेकून दिली, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला. पीडितेचा मुलगा अजयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, संजय (27) आणि जयेश ठाकोर (23) हे दोन भाऊ आहेत. आईच्या प्रियकरावर रागत्यांच्या विधवा आईसोबत 15 वर्षांहून अधिक काळ संबंध असलेले 45 वर्षीय रतनजी ठाकोर यांच्याविरुद्ध त्यांच्या मनात तीव्र नाराजी होती. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की आरोपींचा असा विश्वास होता की या नात्यामुळे त्यांच्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीचा अनादर झाला. आईपासून दूर राहण्याची ताकीदएफआयआरनुसार, संजय आणि जयेश ठाकोर यांचा रतनजी ठाकोर यांच्याशी आधीच वाद होता. तपास अधिकारी (आयओ) उन्नती पटेल म्हणाल्या, ‘त्यांनी वारंवार त्या माणसाला त्यांच्या आईपासून दूर राहण्याचा इशारा दिला आणि समाजातील वृद्धांनाही या प्रकरणात सहभागी करून घेतले. तथापि, हा प्रश्न शांततेने सोडवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. चाकू आणि रॉडने हल्लातपास अधिकारी पुढे म्हणाले, ‘रविवारी, चाकू आणि रॉडने सशस्त्र संजय आणि जयेश यांनी गावात घर बांधत असलेल्या रतनजी ठाकोर आणि त्यांचे सहकारी जिकुजी परमार यांच्यावर हल्ला केला.’ एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की आरोपींनी त्यांचे रक्त ओवाळले- काही कामगार आणि रतनजींच्या सहकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी शस्त्रे भिजवली आणि त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. अशा प्रकारे पोलिसांनी त्याला अटक केलीआयओने सांगितले की पोलिसांनी दोघांनाही त्यांच्या मोबाईल फोन लोकेशनचा वापर करून ट्रॅक केले आणि नंतर त्यांना अटक केली. त्याच्याविरुद्ध खून आणि भडकावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: आईचा प्रेमसंबंध, नाराज मुलांनी केला चाकूने – रॉडने वार अन् घडलं असं काही… Read More »

Parner Police Station

एसआयटीची स्थापना करा नाहीतर आंदोलन करणार…, पारनेर तालुक्यात ‘त्या’ प्रकरणात शेतकरी आक्रमक

Parner News : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात क्रांती शुगर या खासगी कंपनीचे नऊ संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात सहा दिवसांपूर्वी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, या कारखान्यात 17 सभासदांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण संबंधित असून या घोटाळ्याची व्याप्ती 249 ते 300 कोटी पेक्षा जास्त असल्याची सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी होत आहे. मात्र सरकारने आतापर्यंत या प्रकरणात एसआयटी स्थापन न केल्याने पारनेर पोलीस स्टेशन समोर साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणात मिळाली माहिती अशी की, या कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्ज असल्याचे दाखवले आणि विक्रीची बेकायदा प्रक्रिया करण्यात आली. तसेच फक्त पाचशे रुपये मुद्रांक शुल्क कारखान्याचा विक्रीसाठी देण्यात आले. त्यामुळे या व्यवहारात सरकारचा दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला असा देखील आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ज्यादिवशी कारखान्याची विक्री केली त्याच दिवशी क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत घेण्याकरिता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेऊन कर्ज पुरवठा केला. त्यामुळे पारनेर साखर कारखान्याची मालमत्ता फक्त 32 कोटी रुपयांना खरेदी करून त्यावर 249 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले. त्यामुळे कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने 17 हजार सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल करून या प्रकरणात एसआयटीची मागणी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर पोलीस ठाण्यात क्रांती शुगर अ‍ॅण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या खासगी साखर कारखान्याचे अध्यक्ष ज्ञानेश नवले, पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले व निवृत्ती नवले या 9 संचालकांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन जनरल मॅनेजर अनंत भुईभार व वरिष्ठ अधिकारी अनिल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एसआयटीची स्थापना करा नाहीतर आंदोलन करणार…, पारनेर तालुक्यात ‘त्या’ प्रकरणात शेतकरी आक्रमक Read More »

Crime 1

Pune Crime: प्रॉपर्टी हडप करण्याचा संशय अन् पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा केला खून

Pune Crime: घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. फोन केल्यानंतर या पतीने या खुनाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडिया वरती व्हायरल केला आहे. ज्योती शिवदास गीते असे या खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. चंदन नगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते याला अटक केली आहे. ही घटना त्याच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणार आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो. खराडी परिसरात तो भाड्याने राहत आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण होत होती. शिवदास यांनी घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला आहे. माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल असा त्याला संशय होता. या संशयात त्याने ज्योतीचा खून केला. पुढील तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत. ज्योती गीतेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे देण्यात आला असून तो तिच्या मूळ गावी पाठवण्यात आला आहे.

Pune Crime: प्रॉपर्टी हडप करण्याचा संशय अन् पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा केला खून Read More »

Jalgaon Train Accident

Jalgaon Train Accident मृतांचा आकडा 13 वर पोहोचला, रेल्वेकडून आर्थिक मदत जाहीर

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालयाने जळगाव रेल्वे अपघातातील प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जळगाव रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1.5 लाख रुपये, गंभीर जखमींना 50,000 रुपये आणि किरकोळ जखमींना 5000 रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे, असे रेल्वेमंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले. 22 जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यात कर्नाटक एक्सप्रेसने धडक दिल्याने 13 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यूएएनआयशी बोलताना जळगावचे एसपी महेश्वर रेड्डी म्हणाले, जळगाव रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेल्वेने अहवाल सादर केल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू. बुधवारी 22 जानेवारी रोजी पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी आगीच्या भीतीने त्यांच्या डब्यातून बाहेर पडले आणि रुळांवर उभे राहिले तेव्हा ही घटना घडली. दरम्यान, कर्नाटक एक्सप्रेस ट्रॅकवरून गेली, ज्यामुळे अनेक प्रवासी चालत्या ट्रेनने धडकले आणि 13 जणांचा मृत्यू झाला. पुढील तपास सुरू आहे. पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला शोकतत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जळगाव येथे झालेल्या दुःखद रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान म्हणाले, महाराष्ट्रातील जळगाव येथील रेल्वे ट्रॅकवर झालेल्या दुःखद अपघाताने मला दुःख झाले आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि सर्व जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. अधिकारी बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींच्या सर्व वैद्यकीय खर्चाचा खर्चही राज्य सरकार उचलेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देईल आणि जखमींचा संपूर्ण खर्चही राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.

Jalgaon Train Accident मृतांचा आकडा 13 वर पोहोचला, रेल्वेकडून आर्थिक मदत जाहीर Read More »

Fake Money

Fake Money : बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, पुणे पोलिसांनी मोठी कारवाई

Fake Money: पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. नीलेश वीरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहीद जक्की कुरेशी, शाहफहड अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलिस ठाण्यातील तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत होते. पद्मावती बस स्थानकाजवळ पोलिसांना पाहून एकजण स्वारगेटच्या दिशेने पळू लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून अडवले आणि त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या खिशातून पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल मिळाले. रात्री अंधारात तो बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्न करीत होता. त्याला शाहीद कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा यांनी या नोटा दिल्याचे सांगितले. पोलिसांनी वीरकरला नवी मुंबई येथे नेत तिथून शाहीदला अटक केली. चौकशीत अन्सारीने त्याला बनावट नोटा दिल्याची माहिती दिली. सहकारनगर पोलिसांनी एक-एक साखळी जोडत पाच जणांना अटक केली त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार रुपयांच्या पाचशेच्या दोन हजार नोटा जप्त केल्या. या सर्व बनावट नोटा दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आणल्याचे सांगितले. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Fake Money : बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, पुणे पोलिसांनी मोठी कारवाई Read More »

Crime

UP Crime: मामी आणि भाचाचं प्रेम… नंतर मामाचा काढला कटा

UP Crime: मामी आणि भाच्यामधील नात्यात एक लज्जास्पद घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिरोजाबादमध्ये, एका भाच्याने त्याच्या मामाची हत्या केली कारण तो त्याच्या मामीच्या प्रेमात आंधळा झाला होता. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना खैरगड पोलीस ठाण्यातील वैरनी गावातील आहे, जिथे सत्येंद्र नावाच्या तरुणाचे 8 मे 2021 रोजी रोशनी नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. सत्येंद्र आणि रोशनी यांच्या वयात खूप फरक होता, सत्येंद्र त्याच्या पत्नीपेक्षा सुमारे 22 वर्षांनी मोठा होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली, पण काही काळानंतर रोशनीला तिच्या पतीचा भाचा गोविंदवर प्रेम झाले. गोविंद आणि रोशनीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, जे सत्येंद्रच्या लक्षात आले. त्यामुळे घरात वारंवार वाद होऊ लागले. हे प्रकरण इतके वाढले की रोशनी आणि गोविंद यांनी मिळून सत्येंद्रच्या हत्येचा कट रचला. हे षड्यंत्र गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते आणि 14 जानेवारीच्या रात्री ते अंमलात आणण्यात आले. 14 जानेवारी रोजी संध्याकाळी गोविंद त्याचे मामा सत्येंद्र यांच्या घरी आला आणि जेवण करून सर्वजण झोपायला गेले. रात्रीच्या अंधारात गोविंदने त्याचे मामा सत्येंद्र यांची हत्या केली आणि तो पळून गेला. सकाळी सत्येंद्रचा मृतदेह सापडला तेव्हा गावात एकच खळबळ उडाली आणि पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, मृत सत्येंद्रचा भाऊ शत्रुघ्नने हत्येचा अहवाल दाखल केला होता ज्यामध्ये पत्नी रोशनी आणि भाचा गोविंद दोघांनाही आरोपी ठरवण्यात आले होते. एसपी (ग्रामीण) अखिलेश भदोरिया यांनी माहिती दिली की, “चौकशीदरम्यान गोविंदने सांगितले की त्याचे त्याच्या मामीसोबात प्रेमसंबंध होते आणि म्हणूनच त्याने त्याच्या मामाची हत्या केली.” पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

UP Crime: मामी आणि भाचाचं प्रेम… नंतर मामाचा काढला कटा Read More »

Manjiri Karad

Valmik Karad : बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, मंजिरी कराड यांचा खळबळजनक आरोप

Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर आता या प्रकरणात माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा डाव करण्यात येत आहे असा आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडने केला आहे. माध्यमांशी बोलताना माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच आम्हाला मुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका निवडणुकीत माझ्या नवऱ्याने तुमचे काम केले आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देता आहे. असं देखील त्या म्हणाल्या. माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाल्या की मनमानी पद्धतीने गुन्हे दाखल करत आहेत. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की हे थांबवा. घटना घडली त्यादिवशी माझे पती परळीत किंवा जिल्ह्यात नव्हते. वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाले म्हणून डोळ्यात खुपू लागले. बजरंग सोनवणे यांनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

Valmik Karad : बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, मंजिरी कराड यांचा खळबळजनक आरोप Read More »

IMG 20250109 WA0008

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांची कारवाई, चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास लावला, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांनी मोठी कारवाई करत श्रीगोंदा न्यायालय आणि परीसरातुन चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास करत तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करून दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 4 जानेवारी रोजी श्रीगोंदा पो स्टे हद्दीतील काष्टी गावामध्ये एक इसम संशयीत रित्या विना नंबर प्लेटच्या मोटर सायकलवर फिरत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना माहिती मिळाली. या माहितीवरून किरण शिंदे यांनी पेट्रोलिंग करीता काष्टी गावात एक पथक रवाना केले. पेट्रोलिंग दरम्यान श्रीगोंदा चौक, काष्टी येथे एक इसम श्रीगोंदा चौकात मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी संशयीतरीत्या मोटार सायकलवर फिरत असताना मिळून आला. त्यास पोलिसांनी नाव-गांव विचारले असता महेंद्र बाळु सुपेकर (रा. पुनर्वसन काष्टी ता.श्रीगोंदा) येथे राहत असल्याचे सांगीतले तसेच अधिक चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणले. चौकशी दरम्यान पैशांची आवश्यकता असल्याने मी कोर्टाचे पाकींग, श्रीगोंदा शहर, काष्टी गावात व इतर वेगवेगळया ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपींकडून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांची कारवाई, चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास लावला, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

Bikes

Maharashtra News: जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव होणार

Maharashtra News: तालुक्यात अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीत आदेशातील रक्कम शासन जमा न केल्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, अहिल्यानगर जवळील गंगा उद्यानाच्या मागील बाजूस जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या जंगम मालमत्तेची किंमत, अनामत रक्कम, तसेच लिलावाच्या अटी व शर्तीकरिता तहसीलदार अहिल्यानगर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अशी माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली आहे.

Maharashtra News: जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव होणार Read More »