DNA मराठी

Bunty Jahagirdar Death: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण; दोन्ही आरोपींना अटक

bunty jahagirdar

Bunty Jahagirdar Death: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील बंटी जहागीरदार याच्यावर 31 डिसेंबर रोजी दोन जणांनी गोळीबार केल्याने उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे. भर दिवसा जिल्ह्यात गोळीबार झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या धक्कादायक घटनेचा गांभीर्य ओळखत जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

बंटी जहागीरदार अंत्यविधीतून घरी जात असताना 31 डिसेंबरच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पीटल जवळ दोन जणांनी गोळीबार केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात जात असताना त्याचा मृत्यू झाला. तसेच त्याच्यासोबत असणारा अमिन गुलाब शेख हे जखमी झाले असून त्यांचेवर उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 103,109,3(5) तसेच आर्म्स अॅक्ट कलम 3/25 अंतर्गत दोन अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पोलीसांचे 3 पथके यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाणा करण्यात आलेले होती. रात्री उशिरा या गुन्हयातील दोन्ही आरोपी ताब्यात घेतले आहेत त्यांनी गुन्हयाची कबुली दिलीली असुन दोघांनाही सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. कृष्णा अरुण शिनगारे, (वय 23 वर्षे), रविंद्र गौतम निकाळजे (वय 23 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

गुन्हयाच्या अनुषंगाने आरोपींकडे सखोल विचारपुस करण्यात येत आहे. गुन्हयात वापरलेले शस्त्र आरोपींनी कोठुन आणली? गुन्हयाचा प्लॅन कसा केला? गुन्हयामध्ये अन्य कोणी अरोपी सामील आहेत किंवा कसे ? व गुन्हा करण्यामागे नेमके कारण काय. याबाचीचा पोलीस सखोल तपास करत आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर देखील पोलीसांचे बारकाईने लक्ष असून, कोणीही घटनेसंबधाने आक्षेपार्य वा आपत्ती जनक पोस्ट शेअर केल्यास वा घटनेबाबत कोणीही चुकीची माहिती प्रसारित केल्यास किंवा अफवा पसरविल्यास त्यांचेवर देखील पोलीसांकडून कारवाई करण्यात येईल अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *