Dnamarathi.com

BSNL Recharge: Jio आणि Airtel ने त्यांचे प्लान महाग केल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे. तर दुसरीकडे बीएसएनएलचे प्लॅन अजूनही खूपच स्वस्त आहेत, त्यामुळे आता बीएसएनएल वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

 BSNL ने तुमच्यासाठी एक नाही तर दोन उत्तम रीचार्ज प्लॅन आणल्या आहेत. यामधे तुम्हाला बंपर डेटासह सर्व सुविधांचा लाभ मिळणार आहे.  सर्वात आधी आम्ही तुम्हाला 599 रुपयांच्या प्लानबद्दल माहिती देणार आहोत. या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना उत्कृष्ट सुविधा मिळत आहेत.

599 रुपयांच्या प्लॅन

बीएसएनएलच्या 599 रुपयांच्या प्लॅनने बाजारात खळबळ उडवून दिली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला मोठा फायदा मिळत आहे.  या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 599 रुपये ठेवण्यात आली आहे. प्रीपेड प्लॅनमध्ये केवळ एकच नाही तर शक्तिशाली सुविधा उपलब्ध आहेत.  या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची निश्चित करण्यात आली आहे.

याशिवाय युजर्सना प्रतिदिन 3 जीबी डेटाचा लाभ दिला जात आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे.  ​​डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट 40 Kbps च्या वेगाने चालत राहील.

398 रुपयांच्या प्लॅन

 या प्लानमध्ये यूजर्सना अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह 120 जीबी डेटा मिळत आहे. प्लॅनमध्ये एक महिन्याची म्हणजेच 30 दिवसांची वैधता दिली जात आहे. यानुसार यूजर्स रोज 4 जीबी डेटा वापरू शकतात. डेटा मर्यादा संपल्यानंतरही इंटरनेट सुरू राहील.

यूजर्सला दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. हे एसएमएस पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *