Bhaskar Jadhav : महाराष्ट्र विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार मात्र यापूर्वीच सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अधिवेशनाच्या तारखेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. सत्ताधारी पक्ष कशाप्रकारे गृहीत धरून चालू शकतो याचा हे उदाहरण म्हणजे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आज कामकाजा सल्लागार समितीची मीटिंग झाली. यामध्ये हिवाळी अधिवेशना संदर्भात चर्चा झाली. 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर अशी तारीख दिली होती.
दोन आठवड्याच्या ऐवजी तीन आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता. तिने नाही तर निदान ठरल्याप्रमाणे दोन आठवडे तरी घ्या पण सरकारने मान्य केले नाही आणि अधिवेशन 14 तारखेला ठरलं. सत्ताधारी पक्ष संख्येने भरपूर आहे. परंतु विरोधकांच्या पक्षांना सामोर जाण्याचे त्यांच्या धाडस नाही. सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त असला तरी विरोधी पक्षाच्या भडीमरा पुढे आणि त्यांच्या प्रश्नांपुढे उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तर नाहीत म्हणून सत्ताधारी पक्ष हा अधिवेशन वाढवत गेला तयार नाही. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष जाहीर करावा असा आग्रह आम्ही त्यांना करत आहोत असं माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले.
तसेच मी कोणावरही नाराज नाही मी कुठेही नाराज नाही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर दुसरीकडे मतदानाच्या एक दिवस अगोदर निवडणुका पुढे ढकलण्याचा घोषित करतात आणि काल दुपारी सांगतात मतमोजणी 21 तारखेला होणार आहे.
या लोकशाहीची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि स्वायत्त संस्था हे नावाला असलेले निवडणूक आयोग करत आहे. हे आयोग आयोग फक्त कोणाच्यातरी इशाऱ्यावर काम करणारे झालेले आहेत अशी टीका भास्कर जाधव यांनी राज्य निवडणूक आयोगावर केली.






