Bharat Gogawale : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कलर फेकण्यात आल्याची घटना घडली असून यावर आता ठाकरे गटाचे नेते व पदधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. याघटनेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्या कोणत्या नराधमाने हा प्रकार केला आहे. आमच्या मां साहेबांच्या पुतळ्यावर कलर टाकण्यात आला या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस प्रशासन सीसीटीव्हीची तपासणी करत आहे.
मीनाताई या आम्हाला शिवसैनिकांसाठी मा साहेबच होत्या. त्यांनी आम्हा कोणाला कधीही चुकीची वागणूक दिली नाही. मात्र ज्या कोणी हे कृत्य केले त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा ही करण्यात यावी अशी मागणी यावेळी मंत्री भरत गोगवले यांनी केली.