Beed News : बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एकेक धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. वाल्मिक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट, अनाधिकृत वृक्षतोड, यानंतर आता शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून जेलरचे वाहन धुतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून घरातील कामे, वाहनही धुवून घेतले असल्याचे उघड झाले आहे. त्याचाच एक व्हिडिओ समोर आला असून कैद्याकडून वैयक्तिक कामे करून घेतल्याने गायकवाड अडचणीत सापडले आहेत. यापूर्वीही गायकवाड यांचे जळगावला असताना निलंबन झाले होते. कैद्यांचे हक्क आणि संरक्षणाचे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.