Bank FD: देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने रेपो दर 2 वर्षांसाठी स्थिर ठेवला आहे. त्यामुळे आता अनेक सरकारी आणि खाजगी बँका मुदत ठेवींवर
व्याजदर वाढवत आहेत. ज्याचा फायदा ग्राहकांना होताना दिसत आहे असं तर तुम्ही देखील करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही बँका जबरदस्त व्याज देत आहे. 6 बँकांनी जुलै 2024 मध्ये आतापर्यंत FD दर 0.10 ते 0.40 टक्क्यांनी वाढवले आहेत.
ॲक्सिस बँक
ही खाजगी क्षेत्रातील बँक आता 17-18 महिन्यांच्या कालावधीसाठी 3 कोटी रुपयांच्या FD वर ग्राहकांना 7.20 टक्के व्याज देईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.75 टक्के आहे. आता दोन वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 7.10 टक्के व्याज मिळेल. बँक वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर 3 ते 7.2 टक्के व्याज देत आहे.
आयसीआयसीआय बँक
ICICI बँकेने 1 जुलैपासून FD वरील व्याजदरातही बदल लागू केले आहेत. बँक आपल्या ग्राहकांना 15 महिने ते 18 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.75 टक्के व्याज देईल. आता एका वर्षाच्या ठेवींवर 6.7 टक्के व्याज दिले जाईल. तर 5 वर्षांच्या FD वर तुम्हाला 7.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
1 जुलैपासून बँक आपल्या ग्राहकांना 3 कोटी रुपयांपर्यंतच्या 12 महिन्यांच्या एफडीवर 8.25 व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी या FD वर 8.75 टक्के व्याजदर आहे.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडियाचे नवे दर 30 जूनपासूनच लागू झाले आहेत. हे सर्वसामान्य नागरिकांना 7.80 टक्के वार्षिक व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 666 दिवसांच्या ठेवींवर 7.3 टक्के व्याज देत आहे.
पंजाब आणि सिंध बँक
666 दिवसांच्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्के तर सर्वसामान्यांना 7.3 टक्के व्याज मिळत आहे. बँक 222 दिवसांच्या एफडीवर 6.3 टक्के, 333 दिवसांच्या एफडीवर 7.15 टक्के आणि 444 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. सुधारित व्याजदर 1 जुलैपासूनच लागू झाले आहे.
इंडसइंड बँक
बँक सामान्य ग्राहकांना 15 ते 18 महिन्यांच्या FD वर 7.75 टक्के वार्षिक व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के वार्षिक व्याज देत आहे. वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर 3 ते 7.75 टक्के व्याज असते. बँकेचे वाढलेले व्याजदर 3 जुलैपासून लागू झाले आहे.