DNA मराठी

Valmik Karad : बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, मंजिरी कराड यांचा खळबळजनक आरोप

Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

तर आता या प्रकरणात माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा डाव करण्यात येत आहे असा आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडने केला आहे.

माध्यमांशी बोलताना माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच आम्हाला मुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका निवडणुकीत माझ्या नवऱ्याने तुमचे काम केले आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देता आहे. असं देखील त्या म्हणाल्या.

माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाल्या की मनमानी पद्धतीने गुन्हे दाखल करत आहेत. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की हे थांबवा. घटना घडली त्यादिवशी माझे पती परळीत किंवा जिल्ह्यात नव्हते. वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाले म्हणून डोळ्यात खुपू लागले. बजरंग सोनवणे यांनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *