Dnamarathi.com

Anganwadi Worker Recruitment : महिला व बालविकास विभागात तब्बल 18 हजार 882 पदांची भरती होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18882 पदांची भरती करण्यात येणार आहे.

14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *