Ajit Pawar: लोकसभेप्रमाणे यंदा देखील सर्वांचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागला आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असल्याने यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळाली होती तर आता अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे.
यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केला आहे. लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा. असं अजित पवार एका सभेत बोलताना म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी सावळमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की लोकसभेला लोकांमध्ये एक अंडर करंट होता. त्यामुळे लोकसभेला तुम्ही लोकांनी सुप्रिया सुळे यांना मतदान करून साहेबांना खुश केलं आणि आता विधानसभेची ही खालची निवडणूक आहे. त्यामुळे मला मतदान करून मला देखील खुश करा असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने महायुतीला धक्का देत 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला होता तर महायुतीला फक्त 19 जागा जिंकता आले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.