Ahmednagar News: अहमदनगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर शेंडी जवळ अज्ञात व्यक्तीने टायर जाळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
मात्र अद्याप टायर पेटवणारा कोण? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून त्यामुळे टायर पेटवून दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता राज्यात अनेक आंदोलने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची शक्यता आहे.