Dnamarathi.com

Ahmednagar News: डॉ .विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन,परिचर्या महाविद्यालयाने दि. ०५ मार्च २०२४  रोजी लॅम्प लाइटिंग , शपथग्रहण ,पदवी प्रदान व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता.

या कार्यक्रम साठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ. शलिनीताई विखे पाटील या प्रमुख अतिथी होत्या तसेच मा. वसंतराव शाहूजी कापरे, विश्वस्थ, डॉ. .विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, हे या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी होते.

परिचर्या व्यवसायाच्या संस्थपाक फ्लोरेन्स निटिंगेलं यांनी या व्यवसायाचा भक्कम पाया रोवला व रुग्ण सेवेचे बीजारोपण केले. त्यांना स्मरून आज  बी.एस्सी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग अँड मिडविफेरीच्या १२० विद्यार्थ्यांनी मनोभावे रूग्णसेवेची शपथ घेतली.

तसेच आज २०२२-२३ मध्ये पदवी व पदवीत्तर उत्तीर्ण झालेल्या ४७ विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते  पदवी प्रदान करण्यात आली. यानिम्मित्ताने विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मध्ये प्रामुख्याने नर्सेस ला हॉस्पिटल टिम मध्ये समानतेचे व सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी असे मनोगत व्यक्त केले .

महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कला व क्रीडा खेळामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते  पारितोषिके देण्यात आली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे”. आपल्या  देशातील लोकांचे शारीरिक , मानसिक व सामाजिक आरोग्य उंचावण्याची जबाबदारी परिचर्या विद्यार्थी समर्थपणे पार पडतील असा विश्वास मा. वसंतराव कापरे यांनी व्यक्त केला व  पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे आभिनंदन केले  आणि पदवी व पदवीत्तर विद्यार्थ्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. प्रतिभा चांदेकर ,प्राचार्या ,यांनी प्रमुख पाहूण्यांचे  स्वागत करून परिचय करून दिला.

संस्थेचे  चेअरमन  मा . श्री . राधाकृष्ण  विखे पाटील , संस्थेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी मा . खासदार  डॉ . सुजय विखे पाटील   सहभागी पदवी व  पदवीत्तर विद्यार्थ्याना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी डॉ. पी एम गायकवाड (टेक्निकल) संस्थेचे संचालक (मेडिकल ) प्रा. डॉ. अभिजीत दिवटे, प्रा. डॉ. रामचंद्र पडळकर (मुख्य प्रशासकीय अधिकारी) डॉ. प्रतिभा चांदेकर ,प्राचार्या उप प्राचार्या डॉ. औताडे योगिता, यांनी कॉलेज वार्षिक अहवाल सादर केला प्रा. अमोल टेमकर उपस्थित राहिले  .

मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता प्रा. डॉ. सुनील नाथा म्हस्के, वैदकीय अधिक्षक डॉ. सतीश मोरे हॉस्पिटलच्या नर्सिंग अधिक्षक सौ जया गायकवाड ह्या होत्या तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या, विभाग प्रमुख, शिक्षक व पालक उपस्थित होते सूत्र संचालन सौ. पल्लवी कोळपकर व ऋषाली कुंजिर, प्रा. अमोल टेमकर, प्रा. निलेश म्हसके, प्रा. अमित कडू, सौ. पल्लवी खराडे, सौ. वर्षा शिंदे, स्टीफन भांबळ सौ. कविता भोकनाळ, श्री. अमोल शेळके श्री. नितिन निर्मळ, अमोल अनाप यांनी परिश्रम घेतले सौ. सलोमी तेलधुणे यांनी आभार व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *