Dnamarathi.com

Ahmednagar News – ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होत. सध्या ते राज्यभर दौरे करत असून जनतेची भेट घेत आहे. दरम्यान ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतल्याने आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव येथे सकल मराठा समाजाने एका कुत्र्याला छगन भुजबळांचे नाव देत बिस्कीट खाऊ घालत आंदोलन केलं.

सध्या राज्यात ओबीसी व मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याच मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे व छगन भुजबळ हे एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. यामुळे राजकारण तापू लागले आहे. दरम्यान नेत्यांची भाषा खालावू लागल्याने आता मराठा समाज देखील आक्रमक होऊ लागला आहे. नुकतेच भुजबळ यांनी टीका करताना मेंदूने दिव्यांग, टाकीवर चढलेले गाढव एवढ्या वर कोणी नेले असे म्हणत जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली.

यांच्या निषेधार्थ कोपरगाव सकल मराठा समाज आक्रमक झाला असून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी आंदोलन स्थळी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी चक्क एका कुत्र्याला प्रतिकात्मक छगन भुजबळ याचे नाव देत त्याला बिस्किट खाऊ घालत भुजबळ यांची कान उघडणी करण्यात आली आहे. त्यांना या कुत्र्यप्रमाणे इमानदार राहण्याचा व शांत राहण्याचा सल्ला मराठा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सदर अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *