Ahilyanagar Politics: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) अन्वये १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, मिरवणुका आणि प्रेतयात्रांतील जमावावर हा आदेश लागू होणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कर्तव्यावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि सभा किंवा मिरवणूक काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही या आदेशातून सूट राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.





