DNA मराठी

Ahilyanagar Crime: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 120 किलो गांजा जप्त

img 20250830 wa0020

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ओडीसा राज्यातुन विक्री करता आणलेला 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण 80,83,464 रुपये किंमतीचे मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवुन अंमली पदार्थ विक्री व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोनि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दिपक घाटकर, फुरकान शेख लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले यांचे दोन विशेष पथकांनी ही कारवाई केली आहे.

29 ऑगस्ट 2025 रोजी पोनि. किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन इसमांनी ओडीसा राज्यातुन अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन त्यांचा हस्तक नवनाथ अंबादास मेटे रा. श्रीगोंदा व नवनाथ मेटे याचा एक साथीदार यांचेकडील ट्रक क्रमांक एम.एच. 14 जी. यु. 2111 हिमध्ये भरुन विक्री करण्याकरीता आणलेला असल्याची माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार कबाडी यांनी छाप्याचे नियोजन करुन वरील पथक, अहिल्यानगर ग्रामीण उपविभागातील फॉरेन्सिक टिम सह शेंडी बायपास ते एम.आय.डी.सी. जाणारे रोडवर वडगांव गुप्ता गावचे शिवारातील हॉटेल किनाराजवळ सापळा रचुन थांबले असता बातमीतील ट्रक येतांना दिसल्याने नवनाथ अंबादास मेटे (वय 38 वर्षे, रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (वय 31 वर्षे, रा. मळेगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे ताब्यातील ट्रकची पंच, फॉरेन्सिक टिम यांचे मदतीने झडती घेतली असता ट्रकचे केबीनवरील टपावर 6 गोण्यामध्ये 30,22,625-रुपये किमतीचा 120 किलो 905 ग्रॅम गांजासह एकुण 80,83,464 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *