DNA मराठी

Ahilyanagar Crime : पोलिसांची मोठी कारवाई; MIDC उद्योजकाकडून खंडणी मागणाऱ्याला अटक

police

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर एम.आय.डी.सी मधील उद्योजकाकडुन दर महिन्याला खंडणी मागणाऱ्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याला अहिल्यानगर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी 9.30 च्या सुमारास निंबळक एम.आय.डी.सी प्लॉट नं. 07 व 08 येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि. येथे अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांनी बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये प्रवेश करुन, कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करुन काम बंद करण्यास लावून काम चालु करायेच असेल, तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारुन टाकु असे म्हणुन खंडणी मागुन मॅनेजर प्रकाश कोकाटे यांचेकडुन दमदाटी करुन वीस हजर रुपयेची खंडणी घेतली.

तसेच त्यांनी सर्व कामगारांना बोलवुन त्यांचे अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देणेबाबत चिथावणी दिली होती.

त्यानंतर निंबळक एम.आय.डी.सी येथील कंपनीचे उद्योजकांनी सदर घटनेबाबत सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांची प्रत्यक्ष भेट घेवुन संबंधीत इसमाविरुध्द कारवाई करणे बाबत निवेदन दिले होते. तसेच ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजकांना कोणी त्रास देत असले, तर त्यांना कायद्याने ठोकुन काढा ” असे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या वेळी सूचना दिली होती.

त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी निंबळक एम.आय.डी.सी. येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि.या कंपनीकडुन दमदाटी करुन खंडणी घेतलेल्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करणे बाबत आदेश दिल्याने वरील आरोपीविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा करण्यात आला आहे.

त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे रा.एम.आय.डी.सी.,अहिल्यानगर याला ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे. आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याचेविरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत. 

 जो कोणी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजक व कामगारांना त्रास देईल, अशा इसमांविरुध्द तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दयावी. कंपनी उद्योजकांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्या इसमांविरुध्द कठोर कारवाई करुन कंपनी उद्योजकांना संरक्षण देण्यात येईल असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व एम.आय.डी.सी मधील सर्व कंपनी उद्योजक व कामगारांना पोलिसांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *