Agniveer New Rules : अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात पर्मनंट होण्याचा स्वप्न पाहणाऱ्या अग्नीवीरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता अग्निवीरसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार आता अग्निवीरांना लग्नासाठी अट घालण्यात आली आहे.
पर्मनंट सैनिक बनण्याची इच्छा असलेले अग्निवीराला सैन्यात पर्मनंट नियुक्ती मिळेपर्यंत लग्न करू शकत नाहीत. जर अग्निवीर या प्रक्रियेदरम्यान किंवा पर्मनंट सैनिक होण्यापूर्वी लग्न करत असेल तर त्यांना पर्मनंट सेवेसाठी अपात्र ठरवले जाईल. तसेच असे अग्निवीर पर्मनंट सेवेसाठी अर्ज करू शकणार नाहीत किंवा निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत असा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
नवीन नियमानुसार, अग्निवीर भारतीय सैन्यात पर्मनंट सैनिक म्हणून नियुक्त झाल्यानंतरच लग्न करू शकतात. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर, अग्निवीरांना संपूर्ण पुष्टीकरण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे चार ते सहा महिने वाट पहावी लागेल.
अग्निवीर योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत भरती झालेली पहिली तुकडी आता त्यांची चार वर्षांची सेवा पूर्ण करत आहे. अग्निवीरांच्या 2022 च्या तुकडीतील सेवा कालावधी जून आणि जुलै 2026 च्या सुमारास संपेल असा अंदाज आहे. पहिल्या तुकडीमध्ये अंदाजे 20,000 तरुण होते, जे आता निवृत्त होत आहेत.
या अग्निवीरांपैकी सुमारे 25 टक्के लोकांना भारतीय सैन्यात कायमस्वरूपी सैनिक होण्याची संधी मिळेल. निवड शारीरिक तंदुरुस्ती, लेखी परीक्षा आणि इतर निकषांवर आधारित असेल. निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आणि कामगिरीवर आधारित असेल. यशस्वी अग्निवीरांना सैन्यात पर्मनंट सेवा दिली जाईल.
वृत्तांनुसार, लष्कराने असे म्हटले आहे की जर अग्निवीर या कालावधीत लग्न करत असेल तर त्यांना पर्मनंट सेवेच्या शर्यतीतून अपात्र ठरवले जाईल. अशा उमेदवाराचा अर्ज त्यांच्या पात्रतेकडे दुर्लक्ष करून स्वीकारला जाणार नाही. म्हणून, अग्निवीरांना हा नियम गांभीर्याने समजून घेण्याचा आणि त्याचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






