DNA मराठी

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा पासून या मोर्चाला सुरुवात झाली.

महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजातील नरहरी झिरवळ,किरण लमहाटे,डॉ राजेंद्र भारुड यांच्या प्रतिमेचे काही समाज कंटकांनी जागतिक आदिवासी दिनी  दहन केले,त्या समाज कंटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत,12 हजार 500 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी,पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी,यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

शासनाने तात्काळ आमच्या मागण्याची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या मागण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरले असा इशारा माजी आमदार संतोष टारफे यांनी दिलाय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *