Pathardi News : पाथर्डी नगरपरिषदेच्या कार्यालयातील मुख्यधिकारी यांच्या दालनातील खुर्च्यांची मोडतोड करुन अँड प्रताप ढाकणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी टक्केवारी घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त केला.
विकास कामात टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी राष्ट्रवादीचे नेते अँड.प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली भीक मागून आंदोलन करत शहरातील प्रत्येक छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडून एक रुपया जमा करून जमा झालेली रक्कम नगरपालिकेला दान करण्यात आली.
तू लोकप्रतिनिधीचा हप्ता दिला नाही म्हणून एका ठेकेदाराने काही तरुण पाठवत दुसऱ्या ठेकेदाराचे काम बंद पाडले त्यामुळे शहरातील नवी पेठ येथील रस्त्याचे काम बंद पडल्यामुळे नागरिक व व्यवसायिकांची अडचण निर्माण झाली आहे. हे आंदोलन राष्ट्रवादीचे नेते अँड प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
नगरपरिषदेच्या इमारतीवरून मुख्याधिकारी संतोष लांडगे यांची बसण्याची खुर्ची आंदोलकांनी वरून खाली फेकून दिली तर मुख्याधिकारी यांच्या दालनातील असलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या याचीही मोडतोड करण्यात आली.