Bunty Jahagirdar : श्रीरामपूर शहरात भर दिवसा गोळीबाळ झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बंटी जहागिरदार यांच्यावर 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून बंटी जहागीरदार यांना 3 गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज (30 डिसेंबर) दुपारी एका अंत्यविधीतून परत येत असताना त्यांच्यावर शहरातील जर्मन हॉस्पीटल समोर 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत दोन्ही आरोपी फरार झाले. गंभीर जखमी झालेल्या जहागीरदार यांना उपचारासाठी शहरातील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर आता पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगरमध्ये आणण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिस आरोपींचा शोध घेत असून सोशल मीडियावर आरोपींचे फोटो व्हायरल झाले आहे.






