Sanjay Raut on NCP Alliance : पुण्यातील राजकारणात सध्या हाय वॉल्टेज ड्रामा सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेसाठी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आता अजित पवार कोणतीही सुरक्षा न घेता कुठे तरी निघून गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे मला माहिती नाही असं म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला माहिती नाही, त्यांच्या पक्षात काय चाललय त्यावर मी काय बोलणार. अजून तिथे काही घडत नाही आहे. तर दुसरीकडे यावेळी राऊत यांनी
मुंबईमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी बरोबर युतीसाठी आमची सकारात्मक चर्चा झाली असून त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुतेक जागा त्यांना दिल्यात असल्याची माहिती दिली आहे.
तसेच आमच्या युतीत काही अडचण या क्षणी दिसत नाही, मनसेच्या गोटातल्या काही जागा आहेत . पण आम्ही त्याचं समाधान केलंय. आमच्या सोबत असावेत आमची इच्छा आहे. आमच्या वाट्याच्या जागा दिल्यात, आमचं नुकसान झालं पण ठीक आहे ते चालेल. आमच्या अनेक जागा मनसेला सीटिंग आहेत, आमचेही लोक नाराज झाले, पण युतीमध्ये या गोष्टी पहायच नाही असं संजय राऊत म्हणाले.
तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेना मनसे युती आहे. राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे. जागा वाटप पूर्ण झालं आहे पण ठाण्यात महत्व वेगळं आहे, भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचा आहे. लोकसभा विधानसभेच गणित वेगळं होतं तिथे आमची केवळ भाजपशी लढाई असेल असेही संजय राऊत म्हणाले.






