DNA मराठी

Maharashtra Election: राष्ट्रवादीचे 40 स्टार प्रचारक मैदानात; नवाब मलिकसह ‘या’ नावांचा समावेश

nawab malik

Maharashtra Election : राज्यातील 29 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्या नावाला महायुतीमध्ये भाजपकडून जोरदार विरोध पाहायला मिळत आहे मात्र तरी देखील अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्यावर महापालिका निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांचा नाव स्टार प्रचारक म्हणून घोषित झाल्यानंतर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, शरद पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, ज्येष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रमुख नेते नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे आणि विकास पासलकर आदींचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *