Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : राज्यातील राजकारणातील मोठी घडामोड घडली असून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून देखील ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या युतीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
फडणवीस म्हणाले, “शिया आणि युक्रेन एकत्र आल्यासारखे प्रचार केला जात आहे, झेलेन्स्की आणि पुतिन बोलत आहेत, त्यांचे अस्तित्व शोधणारे पक्ष, त्यांचे अस्तित्व गमावलेले पक्ष, ज्यांनी वारंवार भूमिका बदलून स्वतःबद्दल अविश्वास निर्माण केला आहे असे दोन पक्ष एकत्र आले तर काय फरक पडेल? हे दोन्ही पक्ष त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुती बीएमसी निवडणुकीत जिंकेल
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या लोकांनी महायुती सरकारचा विकास पाहिला आहे. मुंबई आमच्यासोबत आहे, मुंबई आमच्यासोबत राहील आणि महायुती बीएमसी निवडणुकीत जिंकेल.”
फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे हे खूप निराश व्यक्ती आहेत, म्हणून मला वाटते की त्यांच्या शब्दांना महत्त्व देऊ नये. तसेच मी हिंदुत्ववादी आहे संपूर्ण जगाला माहिती आहे असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
15 जानेवारी रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज यांनी युतीची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र राहण्यासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला (यूबीटी) फक्त 20 जागा मिळाल्या होत्या, तर मनसेला यश मिळाले नव्हते.






