DNA मराठी

Ram Shinde on Rohit Pawar: जनतेचा कौल राम शिंदेनां ; विजयानंतर राम शिंदेनी रोहित पवारांवर केली टीका

Ram Shinde on Rohit Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत 15 जागा आणि नगराध्यक्ष पदी विजय मिळवला आहे. या विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीकास्त्र डागले आहे, नगरपरिषद निवडणुकीत आमच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले मात्र जामखेडच्या मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे.

अशाच पद्धतीने येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच महाविकास आघाडीला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याच देखील त्यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे भाजपने नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत शानदार कामगिरी करत तब्बल 123 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राहिला आहे. तर काँग्रेसने देखील विदर्भात चांगली कामगिरी करत भाजपला रोखण्याचे प्रयत्न केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत काही खास करता आलेला नाही. जामखेड नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने देखील 2 जागा मिळवल्या आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *