Manikrao Kokate : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी आज उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर केली. मात्र या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देत आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे आदेश दिले आहे.
शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा निर्णय माणिकराव कोकाटे यांची 2 वर्ष कारावासची शिक्षा कायम ठेवली होती. या प्रकरणात शिक्षा कायम असल्याने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.
या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना शिक्षा कायम ठेवण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयाने दिल्यानंतर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.






