Shivraj Bangar on Laxman Hake : लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यातील वातावरण खराब करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आले आहे असा आरोप करत त्यांना संरक्षण देण्यापेक्षा फटके देऊन बीड जिल्ह्यातून हाकलून दिलं पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना शिवराज बांगर म्हणाले की, लक्ष्मण हाकेंला संरक्षण देण्यापेक्षा फटके देऊन बीड जिल्ह्यातून हाकलून दिलं पाहिजे. लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यातील वातावरण खराब करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आले आहे. लक्ष्मण हाकेंची लायकी काय आहे ? हे आम्हाला माहित आहे. त्यांनी अजित पवार गटाच्या आमदार विजयसिंह पंडित यांना शिवीगाळ केली. पण ज्या गावच्या बोरी त्याचं गावच्या बाभळी असतात . माझं त्याला आव्हान आहे लक्ष्मण जरा भानावर ये तुझी औकात विसरू नको, 256 मते आपल्याला विधानसभेला मिळाली अशी टीका शिवराज बांगर यांनी हाके यांच्यावर केली.