MLA Sanjay Kenekar : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगे यांच्याकडे पाहिले जाते अशी टीका आमदार संजय केणेकर यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार संजय केणेकर म्हणाले की, महाराष्ट्रातील शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगे यांच्याकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने हे नुकसान बूबऱ्यांग होणार आहे. हा सुसाईड बॉम्ब त्यांनी वैयक्तिक दोषापोटी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेला आहे. असा हल्लाबोल आमदार संजय केनेकर यांनी केला.
समाजाचे नुकसान शरद पवार करत आहेत. हा सुसाईड बॉम्ब शेवटी समाजाला घेऊन खऱ्या अर्थाने नुकसान पोहोचवणारा आहे. त्यामुळे निश्चितपणे याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. शरद पवारांनी भूमिका स्पष्ट न करता परस्पर सुसाईड बॉम्ब जरांगेसारखे या महाराष्ट्रात वापरतात, हे दुर्दैव आहे.
शरद पवार यांच्या हयातीतल्या भूमिका अशाच राहिलेल्या आहेत. त्यांनी कोणालाच मुख्यमंत्रीपदावर कायमचा बसू दिलेलं नाहीत. निश्चितपणे जरांगे हे गाव गाड्यातले माणसं वापरून, या वाड्यातल्या मराठा नेत्यांना सुरक्षित ठेवण्याची भूमिका ठेवून खऱ्या अर्थाने हा जरांगे पाटलांचा मोर्चा आहे.
हा जातीय आणि व्यक्तिगत द्वेष आहे. कुठेतरी हा जातीय द्वेष शरद पवारांना सातत्याने खूपत असल्यामुळे हा जरांगे यांचा सुसाईड बॉम्ब शरद पवार वापरतात असं आमदार संजय केणेकर म्हणाले.