DNA मराठी

Ganesh Chaturthi 2025 : कृत्रिम तलावांमध्ये श्रीगणेश मूर्ती विसर्जनाला भाविकांकडून उदंड प्रतिसाद

ganesh chaturthi 2025

Ganesh Chaturthi 2025 : सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ अंतर्गत भाविकांनी अधिकाधिक संख्येने श्रीगणेश मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करावे, यंदाचा श्रीगणेशोत्सव पर्यावरण स्नेही रीतीने साजरा करावा, या आवाहनाला भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण मुंबई महानगरात मिळून २९० पेक्षा अधिकृत कृत्रिम तलाव उभारले आहेत.

आज (दिनांक २८ ऑगस्ट २०२५) रोजी दीड दिवसांच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंतची स्थिती लक्षात घेता, एकूण २९ हजार ९६५ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक ३३७ इतक्या तर घरगुती २९ हजार ६१४ इतक्या मूर्तींचा आणि हरतालीकेच्या १४ मूर्तींचाही समावेश आहे. अत्याधिक संख्येने कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जित करण्यात आल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी उच्च न्यायालय व महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही केलेली आहे .त्याची प्रभावी पद्धतीने जनजागृतीही केली आहे .

श्रीगणेश मूर्ती विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व विभाग कार्यालय (वॉर्ड), इतर सर्व संबंधित खाती यांच्यासह मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांचे देखील उत्तम सहकार्य लाभत आहे. मूर्ती विसर्जन सुरळीत होत असून कोणत्याही अप्रिय घटनेची नोंद झालेली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *