DNA मराठी

Gadchiroli Police : गडचिरोलीत मोठी कारवाई, आठ तासांच्या चकमकीनंतर 4 नक्षलवादी ठार

gadchiroli police

Gadchiroli Police : गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 नक्षलवादी ठार केले आहे. तब्बल आठ तास चाललेल्या चकमकीनंतर पोलिसांनी 4 नक्षलवादी ठार (01 पुरुष आणि 03 महिला) केले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांनी दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची विश्वासार्ह गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांचे नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 02 पथके सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती.

सदर भागात सुरू असणाऱ्या प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज सकाळी सदर जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले.

सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर परिसरात शोध घेतला असता एकूण 04 जहाल माओवाद्यांचे मृतदेह (01 पुरुष आणि 03 महिला) मिळाळे आहेत. याशिवाय घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल व 01 .303 रायफल जप्त करण्यात आले आहेत. सदर भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवाद विरोधी अभियान सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *