Pune Crime : मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप तीन मुलींनी कोथरूड पोलिसांवर केला होता. तर आता या प्रकरणात श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
माहितीनुसार या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांनी आणि त्यांच्यासोबत सहकाऱ्यांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल परिपत्रक देखील श्वेता पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फाडून टाकलं होतं यामुळे या मुलीने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एकीकडे या मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे रोहित पवार, अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे राजकीय नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी असताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.