Devendra Fadnavis: माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये आणण्याचे कोर्ट आदेश देईल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात माधुरी हत्तीण आणि वनतारा मुद्दा गाजत असताना आता पुन्हा एकदा माधुरी हत्तीण राज्यात परतणार आहे. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते, त्यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितले की, माधुरी हत्तीणीवर हक्क सांगायची आमची कुठलीही इच्छा नाही. आम्हाला कोर्टाने सांगितल्यामुळे आम्ही हे सर्व केले आहे.
त्यानंतर मी त्यांना सांगितले जर असे असेल, तर तुम्ही देखील आमच्यासोबत सुप्रीमकोर्टमध्ये जॉईन झाल पाहिजे, आपण जॉईंटली कोर्टाला विनवणी करू की, माधुरी हत्तीण तेथेच कोल्हापूरमध्ये नागणी मठ मध्ये एक रेस्क्यू सेंटर तयार करून ठेवू. हायपावर कमिटीने जे निर्देश दिले आहेत. त्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या सोयी तेथेच करू, तेथेच तो माधुरी हत्तीणीला आणू, तुम्ही त्याला समर्थन द्या. अशी मागणी केली. त्याला त्यांनी समर्थन दिले आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच जर कोर्टाने तसा निर्णय दिला, कोर्ट तसा निर्णय देईल अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर सर्व तयार करून द्यायला तयार आहेत. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर कबूतरखाना प्रकरणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असे वाटते की तिकडे आस्था आहे, लोकभावना आहे. आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे, दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल.
धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही, अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे.
काही मार्ग आम्हाला सुचलेले देखील आहे.ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची जी परंपरा आहे. तीदेखील खंडित होणार नाही, आणि आरोग्याचे ही प्रश्न निर्माण होणार नाही. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.






