DNA मराठी

उद्धव ठाकरेंना धक्का, जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश

img 20250716 wa0000

Uddhav Thackeray: कोल्हापूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्यासह उबाठा तसेच शरद पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, आ. सुधीर गाडगीळ, प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, विश्वराज महाडिक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

या सर्वांचे पक्षात स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की या सर्वांच्या साथीमुळे कोल्हापुरातील विकासाची कामे अधिक गतीने पूर्ण होतील. प्रवेश केलेल्या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासासाठी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांच्या विश्वासास सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते पात्र ठरू अशी ग्वाही त्यांनी दिली.

पोवार आणि कोराणे यांच्या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला मोठे यश मिळेल, असा विश्वास खा. धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. पोवार हे पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

करवीर तालुक्यातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये व्हिजन ग्रूपचे अध्यक्ष जनसुराज्य चे संताजी घोरपडे, काँग्रेसचे प्रसाद जाधव, वैभवराज राजेभासले, राजेंद्र थोरवडे तसेच मुंबईतील उबाठा गटाचे मंदार राऊत, संकेत रुद्र यांचा समावेश आहे.

चंद्रपूर येथील उबाठाचे जिल्हाप्रमुख व चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे आणि उबाठाचे सभापती वासुदेव ठाकरे तसेच निफाड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आ. बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार, करण देवतळे आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *