DNA मराठी

पाकिस्तानला उत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम; नितेश राणे स्पष्टच बोलले

Nitesh Rane: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशाचा संतापाची लाट पसरली असून या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सक्षम पंतप्रधान मोदी आहेत आणि यावी ठोस उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

तर दुसरीकडे त्यांनी यावेळी पुण्यात हिंदू सकल समाजाचा मोर्चा निघाला असून जिहादी प्रवृत्तीला प्रत्युत्तर दिले जाईल असं देखील ते म्हणाले. तसेच हिंदूंनी सत्तेत बसवले असल्यामुळे जबाबदारी स्वीकारली आहे. असेही यावेळी ते म्हणाले.

मत्स्य खात्यात गोड्या पाण्यातील तलावातील मासेमारी संदर्भात बैठक पार पडली असून या बैठकीत गाळ कसा काढायचा यावर चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुण्यात मोठे मत्स्यालय सुरू करण्याची योजना असून यासाठी हडपसरमध्ये जागा उपलब्ध करण्यात येणार असं देखील ते म्हणाले.

तर दुसरीकडे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या असून सध्या अपेक्षित उत्पन्न मिळत नाही अशी कबुली देखील यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली.