Maharashtra News: शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील ग्रामस्थ पांडुरंग श्रीधर कोरडे हा गावातील सामाजिक, राजकीय व सांप्रदायिक कार्यक्रमांमध्ये वारंवार हस्तक्षेप करून ग्रामस्थांना वेठीस धरून त्रास देत असुन येथीलच वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या कुटुंबीयांवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्याने आणी गावातील कोणत्याही सामाजिक व विकास कामात अडथळा निर्माण करून खंडणी सारखे प्रकार करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी गावातील किमान ३० ते ३५ ग्रामस्थांनी शेवगाव पोलिसात निवेदन दिले आहे.
कोरडे यांच्यावर कारवाई न झाल्यास येत्या सोमवार दिनांक १० मार्च रोजी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर सुकळी फाट्यावर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख, जनशक्ती विकास आघाडीचे तालुका उपाध्यक्ष हरिश्चंद्र फाटे, जगन्नाथ महाराज गरड, शिवदर्शन गरड, वंचित बहुजन आघाडीचे गणेश बोरुडे, श्रीकिसन काकडे , अंकश गरड आदींसह ग्रामस्थ गावकरीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.