Dnamarathi.com

Ahilyanagar News: नगर जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही.

आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *