DNA मराठी

Sunil Tatkare : संघटन बांधणी…धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचा कोअर ग्रुप

Sunil Tatkare : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संघटन बांधणी,धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

पक्षांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ग्रुपमध्ये सदस्य म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील,वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आदींचा समावेश आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,पक्षसंघटनेची बांधणी,त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भात महत्त्वाच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्त्वाचा उद्देश असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *