Ratan Tata : देशातील सर्वात लोकप्रिय उद्योगपती पैकी एक असणारे रतन टाटा यांचे 4 महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या मृत्युपत्राबद्दल बरीच चर्चा होत आहे.
तर दुसरीकडे नुकतंच त्यांचे मृत्युपत्र उघडण्यात आहे आहे. ज्यामधे अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहे. होय, रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात अशा व्यक्तीचे नाव देखील समविष्ट आहे. ज्याची माहिती फार कमी लोकांना आहे. रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात या व्यक्तीच्या नावावर 500 कोटी रुपयांची मालमत्ता नोंदवली आहे.
रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात त्यांची 500 कोटी रुपयांची मालमत्ता मोहिनी मोहन दत्ता यांना दिली आहे. मोहिनी मोहन दत्ताबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. मोहिनी मोहन दत्ता ही जमशेदपूर येथील ट्रॅव्हल क्षेत्रातील व्यावसायिक आहे. दत्ता यांचे कुटुंब स्टॅलियन नावाची ट्रॅव्हल एजन्सी चालवत होते. 2013 मध्ये, एजन्सी ताज सर्व्हिसेसमध्ये विलीन झाली, त्यानंतर दत्ता कुटुंबाचा स्टॅलियनमध्ये 80% हिस्सा होता. उर्वरित 20% हिस्सा टाटा इंडस्ट्रीजकडे होता. मोहिनी दत्ता टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेसच्या संचालक देखील राहिल्या आहेत.
मोहिनी मोहन दत्ता रतन टाटांच्या जुन्या सहचाऱ्या होत्या. रतन टाटा यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की दत्ता हे त्यांचे जुने मित्र होते. ते टाटा कुटुंबाशीही जवळचे होते. दत्ताच्या एका मुलीने 2021 पर्यंत 9 वर्षे टाटा ट्रस्टमध्ये काम केले. त्यापूर्वी ती ताज हॉटेल्समध्ये काम करायची. ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारात, दत्ता यांनी सांगितले की ते पहिल्यांदा जमशेदपूरमधील डीलर्स हॉस्टेलमध्ये रतन टाटा यांना भेटले. तेव्हा रतन टाटा 24 वर्षांचे होते. दत्ताने दावा केला होता की ते एकमेकांना 60 वर्षांपासून ओळखतात.