Dnamarathi.com

Maharashtra News: अली पब्लिक स्कुल शाळेची कोणतीही मान्यता दर्शवणारे फलक लावण्यात आली नसल्याने कारवाई करण्यात यावी याबाबत गट शिक्षक अधिकारी पंचायत समितीकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे.

या अर्जात म्हटले आहे की, अली पब्लिक स्कुल, व्हिडिओकॉन कंपनीमागे, ग्रामपंचायत नागरदेवळे, बु-हाणनगर, अहमदनगर या ठिकाणी सदर शाळा ही तीन ते चार वर्षापासून सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुले-मुली शिक्षण घेत असुन त्या ठिकाणी शिक्षणासोबत मुलांकरीता हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

ही शाळा चालू असताना सदर शाळेने कोणतेही मान्यता असलेले फलक लावण्यात आले नसुन यामध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते असे आमचे निदर्शनास आले आहे.

सदरील गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असुन सदर विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होऊ नये याकरीता आपण योग्य ती कारवाई करावी. याबाबत चौकशी करुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती. अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *