Maharashtra News: नगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ड्रायव्हरकडून परस्पर टायरची विक्री करून फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक केली आहे. आरोपीकडून 19,94,650 ( 97 टायर) जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर 2024 रोजी
कंटेनर क्रमांक पीबी-13-एडब्लू-5064 यावरील चालकाने सीएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली असल्याचा सुपा पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम 316 (4) प्रमाणे विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याचा तपास करण्यासाठी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोसई/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, गणेश लोढे, पंकज व्यवहारे, फुरकान शेख, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे दोन पथक तयार करुन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन तपास करणेबाबत आदेश दिले होते.
पथकाने यापुर्वी गुन्हयाचे तपासात दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी आरोपी 1) इरशाद निशार अहमद, (वय 55, रा.रामपूर कुमियान, पो.तलालपट्टी, प्रतापगड, उत्तरप्रदेश), 2) अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा, (वय 24, रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड, धुळे) यांना 2,52,000 रूपये किंमतीचे सीएट कंपनीचे 12 टायर अशा मुद्देमालासह सुपा पोलीस स्टेशनला हजर केले होते.
दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी पथक गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना आरोपी नामे अन्सार, (रा.प्रतापगड, उत्तरप्रदेश) हा मुंबई येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने पथकाने मुंबई येथे जाऊन संशयीत आरोपीचा शोध घेऊन, दोन संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अन्सार अहमद (नयाबअली, वय 23, रा.सरायबीर भद्र, ता.सदर, जि.प्रतापगड, उत्तरप्रदेश), 2) जैद खान अजिम खान मोहमंद, (वय 27, रा.आझादनगर, घाटकोपर वेस्ट, मुंबई) असे असल्याचे सांगीतले.
ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाच्या विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा 3) जावेद खान, रा.प्रतापगड, उत्तरप्रदेश (फरार) 4) शरिफ खान, रा.राणीगंज, उत्तरप्रदेश (फरार) 5) जोशेफ अली, रा.पिरथीगंज, उत्तरप्रदेश (फरार) अशांनी मिळून इरशाद निशार अहमद याचे मदतीने मिळून केला असल्याची माहिती सांगीतली.
तसेच गुन्हयांतील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता गुन्हयातील टायर हे सुरत येथील शिवलाल शहा, रा.पाल, सुरत, गुजरात याचे मार्फतीने योगेश गुंजाळ, रा.बेल्हे, आळाफाटा, पुणे यास विक्री केले असल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शिवलाल शहा, रा.सुरत याचा राहते घरी जाऊन शोध घेतला तो मिळून आल्याने त्यास पुर्ण नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 6) शिवलाल हसमुखलाल शहा, वय 58, रा.ए 602, मरोधर रेसीडेन्सी, पाल, सुरत, गुजरात असे असल्याचे सांगीतले.गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली.
दिनांक 31/01/2025 रोजी पथक गुन्हयातील मुद्देमाल हा योगेश गुंजाळ, रा.बेल्हे, पुणे याचेकडे असल्याने त्याचा गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना योगेश गुंजाळ हा त्याचे साथीदारासह बेल्हे गावात तांबेवाडी परिसरात टायर विक्री करण्याकरीता आला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने नमूद ठिकाणी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले.त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 7) योगेश अरूण गुंजाळ, वय 36, रा.दत्तनगर, बेल्हे, ता.जुन्नर, जि.पुणे 8) वैभव भगवंता चौधरी, वय 31, रा.चौधरी मळा, जामगाव, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. तपास पथकाने पंचासमक्ष आरोपीचे ताब्यातुन 15,12,000/-रू किं.त्यात 72 सीएट कंपनीचे टायर, 80,000/- रू किं.त्यात 3 मोबाईल असा एकुण 15,92,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तसेच आरोपी नामे योगेश अरूण गुंजाळ याचे उर्वरीत टायर बाबत विचारपूस करता त्याने सागर उर्फ महाराज शरद रूकारी यांना 10, दत्तात्रय शिवाजी सोमवंशी यांना 4, संकेत अशोक जाधव यांना 5 व राहुल संदीप औटी यांना 6 अशांना कंपनीकडून टायर खरेदी केलेले असून टायरचे बील नंतर देतो असे खोटे सांगुन विक्री केल्याची पंचासमक्ष माहिती दिली.पथकाने पंचासमक्ष त्यांनी हजर केलेले 25 टायर किंमत रूपये 4,02,650/- असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील कारवाई सुपा पोलीस करत आहे.