Maharashtra News: भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या जातीयवादी वक्तव्याने सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने पोलीस अधिक्षक नगर यांना देण्यात आले आहे.
या निवेदन म्हंटले आहे की, काल भगवानगडाचे बाचाळवीर महंत नामदेव शास्त्री यांनी केलेले वक्तव्य अत्यंत बेअक्कल व जातीयदवादी असून त्यांनी केलेल्या वक्तव्याने सकल मराठा समाजाच्या भावनांना ठेच पोचून भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे जातीयवाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे आमच्या भावना तिव्र झाल्या आहेत त्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केलेले आपले वक्तव्य मागे घ्यावे. जर त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
आमच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचून अशा वाचाळवीर महंत नामदेव शास्त्री यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.