Asaduddin Owaisi : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) ने देखील 16 जागांवर उमेदवार दिले आहे.
13 नोव्हेंबर रोजी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी सोलापूरमध्ये फारुख शा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत असताना सोलापूर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली.
नोटीसमध्ये काय होते?
नोटीसमध्ये पोलिसांनी ओवेसी यांना कोणत्याही समाजाच्या भावना दुखावू नयेत आणि त्यांच्या भाषणात भडकाऊ शब्द वापरू नयेत असे निर्देश दिले आहेत. ओवेसींनी नोटीस स्वीकारून आपल्या भाषणात याचा उल्लेख करत पोलिसांकडून देण्यात आलेल्या नोटीस मध्ये स्पेलिंग मिस्टेक असल्याचं सांगितलं.
तसेच पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती नोटीस बजावले असं सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला. याच बरोबर त्यांनी 20 नोव्हेंबर रोजी फारुख शाब्दी यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केला.