Sharad Pawar: राज्यात विधानसभेसाठी बिगुल वाजले असून आता प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) देखील जोरदार प्रचार करत आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत छगन भुजबळ यांचा पराभव करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
या सभेत बोलताना शरद पवार यांनी 2019 च्या निवडणुकीत “चुकीचा उमेदवार” दिल्याबद्दल जनतेची माफी मागितली. तसेच भुजबळांचा पराभव करा असा भावनिक आवाहन देखील यावेळी त्यांनी केला.
या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोठा खुलासा करत म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा भुजबळ यांनी अजित पवारांशी चर्चा करतो असं सागितलं होत मात्र त्यानंतर भुजबळच त्या गटात गेले असं शरद पवार म्हणाले.
तसेच आम्ही त्यांना विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे दिली. मात्र तरीही देखील त्यांनी सर्व मर्यादा ओलांडून विश्वासघात केला. असं देखील शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, भुजबळ विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तेव्हा त्यांना विधान परिषदेवर पाठवले आणि विरोधी पक्षनेतेही केले. ते म्हणाले की, मी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा भुजबळांना पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष केले. येवल्यातून त्यांना रिंगणात उतरवून सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मंत्रीपद देण्याची चूक मी केली.
शरद पवार म्हणाले की, भुजबळांनी काही चुका केल्या आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, मात्र स्वत: सुधारण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांना पुन्हा सरकारमध्ये घेण्यात आले. “जेव्हा भुजबळांवर काही आरोप झाल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले तेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यांना महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारमध्ये पदही दिले,” असेही शरद पवार म्हणाले.