Supriya Sule On Ajit Pawar: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी दमदार भाषण करत अजित पवारांना इशारा दिला आहे.
या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होती असं काय होईल असं कधीच वाटलं नव्हतं.
मागच्या वेळेस ज्या व्यक्तीला तिकीट दिलं त्याच्या एबी फॉर्मवर शरद पवार यांची सही आहे. म्हणजे त्या व्यक्तीला तिकीट शरद पवार यांनी दिल. त्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे.
पोर्षे कार दुर्घटनात ज्या आई-वडिलांचे एक मुलगा आणि एक मुलगी गेली त्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत.
इथल्या स्थानिक नेत्यानी पोर्श कार ज्याची होती त्या आरोपीला बिर्याणी आणि पिझ्झा खायला घातला हे वास्तव आहे.
ज्यांनी पोर्षे कार दुर्घटनेमधील आरोपींना मदत केली त्याच नेत्यानी शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे की तुम्ही या दुर्घटनेच्या केसमध्ये माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेल.
मी त्या नेत्याला आव्हान देते मी एकदा नाही तर शंभर वेळा ज्यांनी त्या दोन युवकांची हत्या केली त्यांची मदत करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात बोलणार तुमच्यात हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांना देखील नोटीस पाठवाच. रक्ताचे सॅम्पल बदलायचं पाप हे तुमच्या सरकारने केला आहे.
अरे शरद पवार दिल्लीच्या तक्ताच्या ईडीच्या नोटीसला घाबरत नाही या तुझ्या नोटीसला काय घाबरणार? माझी त्या व्यक्तीसोबत वैयक्तिक दुश्मनी नाही. पोर्स दुर्घटनेमध्ये सहभाग नसता तर मी त्याच्यावर एक शब्द देखील बोलले नसते.
काही वेळापूर्वी इथे येऊन एका नेत्यांनी भाषण केलं की अनेक लोकांना मी संधी दिली, पक्षाने नाही मी… आता मी जे बोलते ती भाषणाची स्टाईल माझी नाही माझं हे भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार आहे.
इथे येऊन ते म्हणाले कुणाची अंडी पिल्ली माहित आहेत जशी तुम्हाला इथली माहित आहे तशी आम्हाला…. त्यामुळे जुनं काही बोलू नका आणि जर काढलंच तर ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’.
बापू मला तुमच्याकडून आज एक शब्द हवाय तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्या मतदारसंघात एकही एक्सीडेंट झाला तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही तुम्ही सरळ हॉस्पिटलमध्ये जाल.