Rahul Gandhi: राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असून आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. त्याच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात आयोजित सभेत बोलताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून पाच गॅरंटी जाहीर केली आहे.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी जर राज्यात महाविकास आघाडी सरकार आली तर महालक्ष्मी योजना लागू करणार असल्याची ग्वाही दिली. या योजनेअंतर्गत सरकार दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करणार आणि संपूर्ण राज्यात महिलांना मोफत बस प्रवास मिळणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
तर सरकार आल्यावर शेतकऱ्यांना देखील तीन लाखांची कर्जमाफी देणार असल्याची गॅरंटी त्यांनी दिली. या वेळी बोलताना ते म्हणाले की राज्यात सरकार येताच जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत आहे. त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच मुलींप्रमाणे मुलांना देखील मोफत शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे.
तर 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि सर्वांना मोफत औषध वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते.
5 गॅरंटी
महिलांसाठी राज्यभरात मोफत बस प्रवास
राज्यातील सर्व महिलांना 3000 रुपये मासिक मदत
शेतकऱ्यांची तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. कर्ज परतफेडीवर 50,000 रुपये प्रोत्साहन
25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि सर्वांना मोफत औषध वाटप
बेरोजगारांना सरकारकडून मासिक 4000 रुपयांची मदत.