Sandeep Mitke : संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांनी नगर शहर,आर्थिक गुन्हे शाखा, श्रीरामपूर,शिर्डी ,शेवगाव याठिकाणी कामाचा ठसा उमटविला आहे.
तसेच जिल्ह्यातील अनेक गुंतागुंतीचे, संवेदनशील आणि क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच शेवगाव दंगल कौशल्याने हाताळून आरोपी जेरबंद केले.शिर्डी येथील वेश्या व्यवसाय ची पाळेमुळे उखडून टाकण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
यापूर्वी त्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह गौरविण्यात आले आहे. जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना काळामध्ये संदीप मिटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र शहरातील जनतेची काळजी घेतली. या काळात अनेक गोरगरीब जनतेला फूड पॅकेट व किराणा साहित्य वाटप करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीरामपूर येथील संवेदनशील गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.
संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.