Dnamarathi.com

Sandeep Kotkar : नगरचे माजी महापौर संदिप कोतकर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेली खोटी एन.सी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले.

माजी महापौर संदिप कोतकर केडगाव येथे येऊन केडगांव देवीचे दर्शन घेतले मात्र त्यांच्या विरोधात संग्राम संजय कोतकर व इतर दोन यांनी खोटी माहिती पसरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात आणि इतर २०० लोकांविरोधात एन.सी. दाखल केली मात्र एन.सी. ही दुषीत हेतुने प्रेरीत होऊन व काही राजकीय नेत्यांचे दबावा खाली येऊन दाखल करण्यात आल्याने ही एन.सी. रद्द करण्यात यावी तसेच खोटी एन.सी. दाखल करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कोतवाली पोलीस स्टेशन येथे खोट्या घटनेची दि. २४/१०/२०२४ रोजी दाखल केलेली एन.सी. रद्द करुन खोटी एन.सी./तक्रार केल्याने संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

आम्ही सर्व नागरीक आपणास निवेदन करु इच्छितो की, आम्ही सर्व नगर येथील राहणारे असून नगरचे माजी महापौर  संदिप कोतकर हे नगर येथे आल्यामुळे त्यांचे केडगांव ग्रामस्थ यांनी स्वागत करुन भेट घेतली तसेच त्यानंतर त्यांनी केडगांव देवीचे दर्शन घेऊन ते त्यांचे केडगांव येथील निवास स्थानी निघून गेले.

अशाप्रकारे परिस्थिती असताना संग्राम संजय कोतकर व इतर दोन यांनी दुषीत हेतूने प्रेरीत होऊन कुकारस्थान रचण्याचे उद्देशाने खोटी घटना रचून कोतवाली पोलीस स्टेशन येथे ४२ लोक व इतर २०० लोक अशांविरुद्ध बी.एन.एस. कलम १८९ (२), १९०, २२३, ३(५), ३५१ (२), ३५२ अन्वये तक्रार / एन.सी. नोंदविली आहे. सदरची तक्रार / एन.सी. ही पुर्णतः खोटी असून तशी कोणतीही घटना घडलेली नाही.

सदरची एन.सी. ही दुषीत हेतुने प्रेरीत होऊन व काही राजकीय नेत्यांचे दबावा खाली येऊन दाखल केलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सदर तक्रार देणारे तक्रारदार यांचे मोबाईल कॉल डिटेल्स व रेकॉर्डोंग तपासून त्यांना संपर्क करणारे संशयीत व्यक्ती व राजकीय दबाव टाकणारे यांचा शोध लागण्यास मदत होईल व साहेबांना सदर प्रकरणाची सत्य परिस्थिती अवगत होईल.

एन.सी. दाखल करणारे तक्रारदार हे न्युसेन्सिकल पार्श्वभूमी असलेले व उपद्रवी व्यक्ती असून त्यांना विनाकारण खोट्या केसेस, खटले दाखल करण्याची सवय आहे. अशा उपद्रवी लोकांमुळे परिसरातील आमचे सारख्या नागरीकांना फार त्रास होत आहे व वारंवार आमचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होत आहे.

त्यामुळे वरील नोंदविलेल्या खोट्या एन.सी. व तक्रारीची योग्य ती शहानिशा करावी तसेच तक्रारदाराचे मोबाईल कॉल डिटेल्स, रेकॉर्डींग तपासून खोटी एन.सी. दाखल केली म्हणून तक्रारदार व त्याचे बरोबर कटात सामील असलेले संबंधीतांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी व सदरची एन.सी. तात्काळ रद्द करण्यात यावी ही साहेबांना नम्र विनंती.

सदर तक्रार ही तक्रारदाराने इतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व राजकीय मंडळींना हाताशी धरुन नोंदविल्याचा आम्हाला संशय आहे. असं या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *