Maharashtra Assembly Election : राज्यात विधानसभेचे वारे वाहत असल्याने महाविकास आघाडी कडून आणि महायुतीकडून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहे.
यातच काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने दिलेल्या तक्रारीनंतर आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसहितेचा उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
भाजपकडून आरोप करण्यात आला आहे की, आमदार धंगेकर दिवाळीच्या निमित्ताने मतदारांना फराळ वाटप करून त्यांना प्रलोभित करत आहेत,असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला असून, फराळ वाटपासाठी वापरला गेलेला टेम्पो देखील पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आला आहे.
तर दुसरीकडे धंगेकर पुन्हा एकदा कसब्यातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसात त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोप प्रताप वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते.