LPG Gas Price Hike: ऑक्टोबर 2024 ची आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र या महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. होय, आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे. 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 48.50 रुपयांनी महागला आहे.
त्यामुळे आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1691.50 रुपयांवरून 1740 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. नवरात्री, दसरा, दिवाळी या सणांच्या आधी महागडे सिलिंडर लोकांना त्रास देणार आहेत. IOCL वेबसाइटनुसार, हे दर आज 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.
ऑक्टोबर 2024 पासून गॅस सिलिंडरच्या नवीन किमती
तेल विपणन कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीत सिलेंडरची किंमत 1740 रुपये झाली आहे, जी आधी 1691 रुपये होती. कोलकातामध्ये, सिलिंडर 1850.50 रुपयांना मिळेल, जो पूर्वी 1802 रुपयांना मिळत होता. मुंबईत हा सिलेंडर 1692.50 रुपयांना मिळेल, जो पूर्वी 1644 रुपयांना मिळत होता. चेन्नईमध्ये सिलिंडर 1903 रुपयांना मिळेल जे आधी 1855 रुपये होते.
जुलै महिन्यापासून 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढ
गेल्या जुलै 2024 पासून 19 किलो LPG सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. 1 जुलै 2024 रोजी दिल्लीत या सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली. पण ऑगस्ट 2024 मध्ये 19 किलोग्रॅमचा गॅस सिलिंडर 8.50 रुपयांनी महागला. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत त्याची किंमत थेट 39 रुपयांनी वाढली होती.